Champions Trophy 2025 : भारत - पाकिस्तान भांडणात तिसऱ्याची उडी... चॅम्पियन्स ट्रॉफी युरोपात होणार?

Champions Trophy 2025
Champions Trophy 2025esakal
Updated on

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे अधिकृत आयोजक हे पाकिस्तान आहे. मात्र पाकिस्तानातील सुरक्षेचे बारा वाजलेत. त्यामुळे अनेक संघ पाकिस्तानचा दौरा करण्यासाठी धजावत नाहीत. तसेच पाकिस्तान दहशतवादाचं केंद्रस्थान असल्याने भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यास स्पष्टपणे नकार देते. अशा परिस्थितीत आशिया कप पाठोपाठ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक पद देखील पाकिस्तानच्या हातून निसटण्याची शक्यता आहे.

Champions Trophy 2025
Schoolympics 2023 : तिरंदाजीत अखेरच्या दिवशी गोखळीच्या गुरुकुल विद्यामंदीरने पटकावले पाच पदक

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन दुबईत केले जाण्याची शक्यता वर्तवणारे वृत्त आले होते. यानंतर पाकिस्तानने जर असं झालं तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भरपाई द्यावी अशी मागणी केली. या सर्व घडामोडीत आता आईसलँड क्रिकेट बोर्डाने उडी घेतली असून त्यांनी थेट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरच दावा ठोकला. त्यांनी ट्विट करून आयसीसीचे प्रमुख ग्रेग बार्कले यांच्याकडे मागणी केली.

आईसलँड क्रिकेटने ही मागणी गंमत म्हणून केली आहे. तसंही आईसलँड क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्विट हँडलवरून जागतिक क्रिकेट वर्तुळात घडणाऱ्या घटनांवर विनोदबुद्धीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावर देखील त्यांनी आसाच गंमत म्हणून दावा ठोकला.

Champions Trophy 2025
Schoolympics 2023 : ज्यूदो स्पर्धेत विराट, विश्वजितला सुवर्णपदक

आईसलँड क्रिकेट बोर्ड आपल्या ट्विटर हँडलवरून म्हणते की, 'आम्ही माघार घेणाऱ्या लोकांपैकी नाही आहोत. आम्ही आज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजक पदावर दावा ठोकत आहोत. याबाबत आयसीसीच्या ग्रेग बार्कले यांचं काय म्हणणं आहे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.'

यापूर्वी देखील आईसलँड क्रिकेट बोर्डाने बाबर आझमवर निशाना साधला होता. बाबर आझमने सर्व क्रिकेट फॉरमॅटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्या वर्ल्डकपमधील सुमार फलंदाजीच्या प्रदर्शनावर आईसलँड क्रिकेट बोर्डाने चिमटा काढला होता.

त्यांनी, 'बाबर आझमची फलंदाजीतील सरासरी! साथरोगानंतर अजूनही काही गोष्टी सामान्य झालेल्या नाहीत.'

पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप 2023 मध्ये साखळी फेरीतच गारद झाला होता. बाबर आझमची कामगिरी देखील सुमारच राहिली होती. त्याने 40 पेक्षाही कमी सरासरीने 9 सामन्यात फक्त 320 धावा केल्या.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.