Chennai Super Kings : 'सपोर्ट' करण्यात MI चे चाहते पडले मागे... 10 मिलियन्सचा टप्पा गाठणारी CSK पहिला संघ

Chennai Super Kings
Chennai Super Kings esakal
Updated on

Chennai Super Kings : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने मैदानाबाहेरही आपला दबदाब निर्माण केला आहे. त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर करेला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आता ट्विटवर 10 मिलियन्स फॉलोअर्स ( 1 कोटी) असलेली आयपीएलमधील पहिली टीम ठरली आहे.

सीएसकेने याबाबतची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत दिली. चेन्नई सुपर किंग्जने आपल्या चाहत्यांचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत. चेन्नई हा सर्वात कट्टर चाहते लाभलेला एक संघ आहे. कोणत्याही परिस्थितीत चेन्नईचे चाहते त्यांच्या संघापासून दूर जात नाहीत. (CSK 10 Millions Twitter Follower News)

Chennai Super Kings
ISSF World Championship : भारताच्या नेमबाजांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत देशाला जिंकून दिलं पहिलं पदक

आयपीएलधील 5 विजेतेपदं पटाकवणारी अजून एक मोठा फॅन बेस असलेली टीम म्हणजे मुंबई इंडियन्स! मात्र मुंबईचे ट्विटरवरील फॉलोअर्स हे 8.2 मिलियन इतके आहेत. आयपीएलमधील संघाबाबत विचार करायचा झाला तर ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स हे चेन्नईचे आहेत.

चेन्नईचे 10 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर मुंबईचे 8.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याच्या खालोखाल रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे ट्विटरवर 6.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. चौथ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स आहे. त्यांचे 5.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर सनराईजर्स हैदराबादजे 3.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. ते पाचव्या स्थानावर आहेत.

Chennai Super Kings
Neymar Al-Hilal : काय त्या गाड्या.. काय तो राजवाडा.. नेमारवर अल - हिलालनं केला मोठा खर्च

पंजाब किंग्जचे 2.9, राजस्थान रॉयर्सचे 2.7, दिल्ली कॅपिटल्सचे 2.5, लखनौ सुपर जायंट्सचे 760.4K आणि सर्वात शेवटी गुजरात टायटन्सचे 522.7K फॉलोअऱ्स आहेत. आयपीएल 2023 मध्ये चेन्नईने गुजरातचा पाच विकेट्सनी पराभव करत पाचव्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. याचबरोबर 14 हंगामात 5 विजेतेपदं पटकावणाऱ्या चेन्नईने मुंबईच्या सर्वाधिक आयपीएल विजेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.