IPL 2023 is MS Dhoni : आयपीएल 2023 साठी सर्व संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. आता 23 डिसेंबरला कोची येथे होणाऱ्या मिनी लिलावात काही खेळाडू खरेदी करून सर्व संघ आपला संघ तयार करतील. सर्वांना आश्चर्याचा धक्का देत चेन्नई संघाने रवींद्र जडेजाला कायम ठेवले आहे. असे मानले जात होते की चेन्नई आणि जडेजामध्ये काही ठीक नाही आणि यावेळी चेन्नईचा संघ जडेजाला कायम ठेवणार नाही. मात्र, तसे झाले नाही आणि जडेजा अजूनही संघाचा एक भाग आहे.
हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?
जडेजा आणि धोनी दोघेही चेन्नईच्या संघात आहेत. अशा परिस्थितीत संघाचे नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जडेजावर पुन्हा विश्वास बसणार की धोनी संघाची धुरा सांभाळणार? यावर माजी भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा म्हणतात की, महेंद्रसिंग धोनी जोपर्यंत चेन्नई संघाकडून खेळत आहे तोपर्यंत दुसरा कोणताही खेळाडू संघाचा कर्णधार होऊ शकत नाही.
भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा म्हणाला की, जोपर्यंत एमएस धोनी खेळत आहे, तोपर्यंत वेगळा कर्णधार असू शकत नाही. हे गेल्या वर्षी स्पष्ट झाले आहे. जर तुम्ही मला हा प्रश्न वर्षभरापूर्वी विचारला असता, तर माझे उत्तर वेगळे असते. पण सीएसकेबद्दल मला जे काही माहीत आहे, जर हे एमएस धोनीचे शेवटचे वर्ष असेल तर त्यांना कर्णधारपद अशा एखाद्या व्यक्तीकडे सोपवायचे आहे जो पुढील पाच ते सहा वर्षे ही भूमिका बजावू शकेल आणि संघात स्थैर्य आणू शकेल. ज्या संघाला जास्त बदलांवर विश्वास नाही आणि त्यामुळे दीर्घकालीन कर्णधाराचा शोध घेईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.