Chess Olympiad 2024 India winning start : भारतीय बुद्धिबळ संघाने बुधवारी बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विजयी सुरुवात केली. भारतीय संघाने खुल्या गटात पहिल्या फेरीत मोरोक्को संघाचा ४-० असा पराभव केला आणि सुवर्णपदक जिंकण्याचा आपला इरादा स्पष्ट केला. तेच भारतीय महिला संघाने जमैका संघाविरुद्ध ३.५-०.५ असा विजय मिळवला. हरिका द्रोणवल्लीच्या अनुपस्थितीत वैशाली भारतासाठी अव्वल बोर्डावर खेळली. तानिया सचदेव आणि दिव्या देशमुख यांनीही विजयाची नोंद केली, तर वंतिका अग्रवाल हिला रेहेन्ना ब्राउनने बरोबरीत रोखले.
जागतिक विजेतेपद नावावर असलेल्या १८ वर्षीय गुकेशने पहिल्या फेरीत न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रज्ञानंदा भारतासाठी अव्वल बोर्डावर खेळला आणि त्याने ४७ वर्षीय मोहम्मद तिसीरला प्रत्युत्तर दिले. ऑक्टोबर २००६ मध्ये मोहम्मदचे २४९० चे सर्वोच्च रेटिंग आले, जेव्हा प्रज्ञानंदा एक वर्षाचा होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.