बुडापेस्ट : भारतीय पुरुष संघाची बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील विजयी मालिका गुरुवारीही कायम राहिली. भारतीय पुरुष संघाने इराण संघावर ३.५-०.५ असा एकतर्फी विजय साकारला. भारतीय पुरुष संघाचा यंदाच्या स्पर्धेतील सलग आठवा विजय ठरला. भारताने गुणतालिकेतील पहिलेस्थान १६ गुणांसह कायम राखले.