SA vs IND : रहाणे-पुजाराचं करायचं काय?

Pujara And Rahane Latest News
Pujara And Rahane Latest News Sakal
Updated on

South Africa vs India, 2nd Test At Johannesburg : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहन्सबर्गच्या मैदानात सुरु आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या लोकेश राहुलनं (KL Rahul) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सार्थ करण्यासाठी तो एकटा खिंड लढवताना दिसतोय. लोकेश राहुलनं सलामीवर मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) साथीनं भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. मयांक स्वस्तात माघारी फिरल्यानंतर संघाचा डाव सावरण्याची जबाबदारीही अजिंक्य रहाणेवर (Ajinkya Rahane) होती. पण तो पुन्हा एकदा अपयशी ठरला.

पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतकाच्या उंबरठ्यावर अडकलेला अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पहिल्याच चेंडूवर बाद झाला. ओलिव्हरनं (Olivier) याने त्याला खातेही उघडू दिले नाही. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या पुजारानेही निराश केले. तो अवघ्या तीन धावा करुन माघारी फिरला. पुजाराने (Cheteshwar Pujara) 33 चेंडूचा सामना करण्याचा संयम दाखवला. पण तो पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे या दोघांचे आता करायचे काय? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला तर नवलं वाटू नये.

Pujara And Rahane Latest News
दुसऱ्या कसोटीला मुकणाऱ्या विराटला झालयं तरी काय?

अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसांपासून एका एका धावेसाठी संघर्ष करताना दिसतोय. खराब कामगिरीमुळेच त्याने कसोटी संघाचे उपकर्णधारपद गमावले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याला संधी मिळेल की नाही याबबातही संभ्रम होता. अखेर परदेशातील कामगिरीच्या जोरावर त्याला संधी मिळाली. ही संधी त्याच्यासाठी अखेरची असू शकते. कसोटी पदार्पणात शतकी खेळी करुन श्रेयस अय्यरनं त्याला चॅलेंज देण्यास सज्ज आहे.

Pujara And Rahane Latest News
श्रीलंका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूवर झाला होता बलात्कार?

पुजारा-रहाणे फ्लॉप शोचा सिलसिला

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरच नाही तर पुजारा-रहाणे जोडी बऱ्याच दिवसांपासून संघर्ष करत आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या विरुद्धच्या मालिकेतही या जोडीला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हता. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दोघातील एकजण बाकावर बसेल असे वाटत होते. पण दोघांना संधी देण्यात आली. पण त्यांचा फ्लॉप शोचा सिलसिला काय थांबताना दिसत नाही. दुसऱ्या डावात जर हीच परिस्थिती दिसली तर तिसऱ्या कसोटीत टीम इंडियात मोठा बदल दिसू शकतो. जर या दोघातील एकाचा पत्ता कट झाला तर नवल वाटू नये. द्रविड यांना आणखी एक संधी देणार की बाहेरचा रस्ता दाखवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.