ODI WC 2023: आगरकर निघाला विंडीजला! वर्ल्ड कपसोबतच रोहित-विराटच्या भविष्यावर होणार मोठा निर्णय

Team India ODI WC 2023
Team India ODI WC 2023sakal
Updated on

Team India ODI WC 2023 : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, जिथे आता कसोटी मालिका खेळल्या जात आहे. पहिला सामना झाला असून त्यानंतर 20 जुलैपासून दुसरा सामना होणार आहे. कसोटीनंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि शेवटी पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका असेल.

बीसीसीआयने त्या दोन्ही मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. याच काळात टीम इंडिया 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारीही करत आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप व्हायची आहे. या दौऱ्यादरम्यान मुख्य निवडकर्ता अजित आगरकर वेस्ट इंडिजला जाऊन कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यांना भेटल्यानंतर तो अनेक मोठे निर्णय घेऊ शकतो.

Team India ODI WC 2023
Wi vs Ind 2nd Test: उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर टांगती तलवार; रोहित 'या' मराठमोळ्या खेळाडूला देणार संधी?

खरं तर, टीम इंडियाच्या निवड समितीचे सदस्य सलील अंकोला अजूनही वेस्ट इंडिजमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर असे वृत्त आले की, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर लवकरच वेस्ट इंडिजला रवाना होऊ शकतो. या मालिकेसाठी संघाची घोषणा केल्या पासुन अजित आगरकर अद्याप संपूर्ण संघाला भेटला नाही. तो बाकीच्या टीमसोबत मेल मीटिंग करणार आहे, पण सर्वात मोठं काम म्हणजे त्याला प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माला भेटायचं आहे.

Team India ODI WC 2023
Wi vs Ind: ऋतुराजची एंट्री, कोहली किंवा रहाणेला डच्चू? दूसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित घेणार मोठा निर्णय

रिपोर्ट्सनुसार, या बैठकीत टीम इंडिया 2023 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी रोड मॅप तयार करणार आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह, केएल राहुल, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांसारखे टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू सध्या दुखापतग्रस्त आहेत. याबाबत एनसीएचा अहवाल काय आहे, यावरही चर्चा होऊ शकते. इतकंच नाही तर अजित आगरकर रोहित आणि विराट कोहलीला भेटून 2024 चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय योजनांवर चर्चा करतील.

Team India ODI WC 2023
Asian Games 2023 : दोनवेळची चॅम्पियन टीम इंडिया सहभागी होऊ शकत नाही... प्रशिक्षक झाले भावूक

एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, ज्या दिवशी इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ आमनेसामने येणार आहेत. पण टीम इंडिया 8 ऑक्टोबरला पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळण्यासाठी उतरणार आहे. जेव्हा त्याचा सामना ऑस्ट्रेलियाशी चेन्नईमध्ये होईल.

पण विश्वचषकातील सर्वात मोठा सामना 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. मात्र आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेचा रस्ता कर्णधार, प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता मिळून वेस्ट इंडिज दौऱ्यावरच तयार करतील, असे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.