Chetan Sharma Sting Operation : बीसीसीआयचे निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा आणि वाद हे एक समिकरच झालं आहे. चेतन शर्मांना माध्यमांना हाताळता येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
शर्मांना बीसीसीआयने दुसरी संधी दिली मात्र महिन्याभराच्या आतच ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका न्यूज चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी भारताच्या संघ निवडीबाबतची गुप्त आणि संवेनशील माहिती सार्वजनिक केली.
भारताच्या ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर चेतन शर्मांची निवडसमिती बीसीसीआयने बर्खास्त केली होती.
परंतु निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा यांना दुसऱ्यांदा संधी देत बीसीसीआयने आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र दुसरी संधी मिळून देखील चेतन शर्मा यांच्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे दिसते.
चेतन शर्मा यांनी एका स्टिंग ऑपरेशनमध्ये जसप्रीत बुमराह, विराट कोहली सारख्या खेळाडूंच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचेल अशी वक्तव्य केली आहे.
चेतन शर्मा यांनी कोच राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्याशी झालेल्या संभाषणाबाबतही माहिती देऊन वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी झी न्यूजने केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये गुप्त आणि संवेदनशील माहिती सार्वजनिक केली.
शर्मा यांनी अनेक खेळाडू हे 80 ते 85 टक्केच फिट असताना इंजक्शन्स घेऊन व्यावसायिक क्रिकेटमध्ये लवकरात लवकर परतण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला.
याचबरोबर त्यांनी टी20 वर्ल्डकप दरम्यान जसप्रीत बुमराहच्या पदार्पणाबाबत संघ व्यवस्थापन आणि त्यांच्यामधील झालेल्या मतभेदाचीही माहिती देऊन टाकली.
जसप्रीत बुमराह अजूनही पूर्णपणे फिट झाला नसून तो ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका तसेच वनडे मालिकेला देखील मुकणार आहे.
चेतन शर्मा यांनी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष यांच्यात इगो प्रॉब्लेम झाला असल्याचेही सांगितले. दरम्यान, स्टींग ऑपरेशनमध्ये इतकी माहिती उघड केल्यानंतर पीटीआयने त्यांच्याशी संपर्क केला त्यावेळी ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध नव्हते.
मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने याबाबत लक्ष घातले आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, 'चेतन शर्माच्या भविष्याचा निर्णय हा जय शहांच्या हातात आहे.
आता टी 20 कर्णधार हार्दिक पांड्या आणि वनडे - कसोटी कर्णधार रोहित शर्मा चेतन शर्मांसोबत निवडसमितीच्या बैठकीवेळी एकत्र बसणार का असा प्रश्न निर्माण होतो. कारण शर्मा वैठकीतील माहिती माध्यमांना देतात.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.