Liren vs D Gukesh Chess: भारताच्या डी. गुकेशचे पारडे जड; विश्‍वविजेतेपदाच्या लढतीआधी चीनच्या डिंग लिरेनने व्यक्त केली भीती

Ding Liren praises D Gukesh: यावर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर यादरम्यान होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम लढतीत डी. गुकेश आणि डिंग लिरेन आमने - सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी डिंग लिरेन याने भीती व्यक्त केली आहे.
D Gukesh
D GukeshSakal
Updated on

China's Ding Liren on India's D Gukesh: यावर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर यादरम्यान जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम लढत खेळवण्यात येणार आहे; पण या लढतीआधी चीनचा गतविजेता डिंग लिरेन याने भीती व्यक्त केली आहे.

जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारताच्या डी. गुकेशचे पारडे जड आहे. कारण मागील एक वर्षामध्ये माझा खेळ कमालीचा घसरला आहे, असे मत डिंग लिरेन याने याप्रसंगी व्यक्त केले आहे.

बुडापेस्ट येथे बुद्धिबळ ऑलिंपियाड ही प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून डिंग लिरेन याची मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावर ही मुलाखत पोस्ट करण्यात आली. बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेमध्ये डी. गुकेश भारताचे, तर डिंग लिरेन चीनचे प्रतिनिधित्व करीत आहे.

D Gukesh
Chess Olympiad 2024: भारतीय संघाचे पहिल्या चारही फेरीत वर्चस्व; महाराष्ट्राची दिव्या देशमुखचीही चमकदार कामगिरी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.