शेनझेन (चीन), ता. २० : भारतीय बॅडमिंटनपटूंनी चायना मास्टर्स स्पर्धेचा बुधवारचा दिवस गाजवला. पी. व्ही. सिंधू, मालविका बन्सोड यांनी महिला एकेरीमध्ये, तर लक्ष्य सेन याने पुरुषांच्या एकेरीमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर विजय संपादन करताना पुढे पाऊल टाकले. .भारताची फुलराणी पी. व्ही. सिंधू हिने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान हिच्यावर २१-१७, २१-१९ असा ५० मिनिटांमध्ये विजय साकारला. पहिल्या गेममध्ये बुसानन हिच्याकडे १४-१० अशी आघाडी होती. सिंधूकडून दोन वेळा चूक घडली. याचा फायदा बुसानन हिने घेतला. यानंतर मात्र सिंधू हिने सलग नऊ गुण कमवत १९-१४ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सिंधू हिने पहिला गेम २१-१७ असा आपल्या नावावर केला. .पी. व्ही. सिंधू-बुसानन ओंगबामरुंगफान यांच्यामध्ये दुसऱ्या गेममध्येही कडवी झुंज पाहायला मिळाली. बुसानन हिने बहुतांशी वेळा आघाडी कायम ठेवली; पण सिंधूने दबावाखाली आपला खेळ उंचावला. अखेर १८-१७ अशी आघाडी घेत पुढे जाऊन २१-१९ असा सामना आपल्या नावावर केला. सिंधू-बुसानन यांच्यामध्ये आतापर्यंत २१ लढती पार पडल्या आहेत. त्यापैकी २० लढतींमध्ये सिंधूने विजय साकारला हे विशेष. .तीन गेममध्ये कडवा संघर्षपॅरिस ऑलिंपिकमध्ये पदकापासून थोडक्यासाठी दूर राहिलेल्या लक्ष्य सेन याला मागील तीन स्पर्धांमध्ये सूर गवसला नाही. त्याच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली; मात्र लक्ष्य याने चायना मास्टर्स स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत शानदार कामगिरी केली. त्याने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या मलेशियाच्या ली झी जिया याच्यावर २१-१४, १३-२१, २१-१३ असा तीन गेममध्ये संघर्षपूर्ण विजय संपादन केला. भारताच्या या पठ्ठ्याने ५७ मिनिटांमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात केली. याप्रसंगी लक्ष्यने तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष देत असल्याचे म्हटले. .ट्रिसा-गायत्री जोडीचीही आगेकूचभारताला बुधवारी दुहेरीतही यश संपादन करता आले. ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद या जोडीने हू फँग-झेंग ची या जोडीवर २१-१५, २१-१४ अशी मात केली. भारतीय जोडीने ३५ मिनिटांमध्ये बाजी मारली. महिला एकेरीमध्ये पी. व्ही. सिंधू हिच्यासह मालविका बन्सोड हिनेही कडव्या संघर्षानंतर प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली. मालविका हिने लाईन होझमार्क हिला २०-२२, २३-२१, २१-१६ असे नमवले. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.