China Masters 2024 : भारताची पुरुष दुहेरीतील अनुभवी जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी पुनरागमनाच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सात्विक -चिराग जोडीने दुसरी मानांकित जोडी किम ॲस्टरुप-अँडर्स रासमुसेन या डेन्मार्कच्या जोडीवर २१-१६, २१-१९ असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला आणि अंतिम चार फेरीमध्ये प्रवेश केला.