टेनिस स्टार पेंग शुईने तिच्या देशातील एका वरिष्ठ नेत्यावर खळबळजनक आरोप केलाय.
चीन : चीनची टेनिस स्टार पेंग शुईने (Peng Shuai) तिच्या देशातील एका वरिष्ठ नेत्यावर खळबळजनक आरोप केलाय. 35 वर्षीय पेंगनं माजी उपपंतप्रधान झांग गाओली (Zhang Gaoli) यांच्यावर लैंगिक संबंध असल्याचा आरोप केलाय. पेंगनं सोशल मीडियाच्या 'वाइबो'वर आपली पोस्ट शेअर केलीय. काही वेळानं तिनं ही पोस्ट डिलीट केली असली, तरी पेंगच्या पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल होऊ लागले आहेत.
एपीच्या रिपोर्टनुसार, पेंगनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, की झांग यांनी काही वर्षांपूर्वी माझ्यावर जबरदस्तीनं लैंगिक संबंध ठेवले होते. यानंतर दोघांत सहमतीचं नातं निर्माण झालं. झांग माझ्या प्रेमात पडले, पण माझा त्यांच्यावर कोणताच विश्वास नव्हता. तीन वर्षांपूर्वी बीजिंगमध्ये झालेल्या टेनिस सामन्याचे आयोजन झांग यांनी केलं होतं. यानंतर झांग यांनी पेंगला त्यांच्या खोलीत नेलं आणि तिथं पेंगवर जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पेंग खूपच घाबरली. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कोणतेही पुरावे नव्हते, असं ती म्हणाली.
विशेष म्हणजे, झांग हे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पहिल्या कार्यकाळात (2012-2017) सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सात सदस्यीय पॉलित ब्युरो स्थायी समितीचे सदस्य होते. 2018 मध्ये ते उपपंतप्रधान म्हणून निवृत्त झाले. झांग यांच्याकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याशिवाय चीनच्या स्टेट कौन्सिल माहिती कार्यालयानंही या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 2018 मधील MeToo चळवळीनंतर चीनच्या वरिष्ठ राजकारण्यावर आरोपांची ही पहिलीच घटना आहे.
पेंगनं विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन जिंकलं
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनाही नियमित पत्रकार परिषदेत पेंगच्या 'वाइबो' पोस्टबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, या प्रकरणी उत्तर देताना त्यांनी या विषयाची माहिती नसल्याचे सांगितले. हा परराष्ट्र व्यवहाराशी संबंधित प्रश्न नाही, असंही ते म्हणाले. पेंगला महिला दुहेरीची अव्वल खेळाडू मानलं जातं. तिने 2013 मध्ये विम्बल्डन आणि 2014 मध्ये फ्रेंच ओपनसह अनेक दुहेरी विजेतेपदे जिंकली आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.