IND vs ENG: सेमीफायनल सामन्याआधी आली वाईट बातमी! 'हा' गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

IND vs ENG
IND vs ENGsakal
Updated on

IND vs ENG T20 World Cup : टी-20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात आज अॅडलेडमध्ये खेळल्या जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या काही तास आधी एक मोठी बातमी समोर येत आहे. सामन्यापूर्वी इंग्लंड संघाकडून ही वाईट बातमी समोर येत आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही.

IND vs ENG
Shaheen Afridi : सेलीब्रेशन करताना आफ्रिदीने घेतली मोठी रिस्क; फायनलला मुकणार...

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडला या सामन्यात खेळणे कठीण दिसत आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार मार्क वुड भारताविरुद्ध खेळू शकणार नाही. मार्क वुडने या स्पर्धेत आतापर्यंत 4 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये मार्क वुडने 154.74kph च्या वेगाने सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे.

IND vs ENG
Shoaib Malik VIDEO : आधी सडकून टीका आता फायनलला गेल्यानंतर शोएबचा नाचून दंगा!

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, इंग्लंड संघाने मार्क वुडच्या बदलीची तयारीही केली आहे. मार्कच्या जागी क्रिस जॉर्डनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याची योजना संघ व्यवस्थापनाने आखली आहे. ख्रिस जॉर्डनने या टी-20 विश्वचषकात अद्याप एकही सामना खेळलेला नाही. ख्रिस जॉर्डनने इंग्लंडसाठी एकूण 82 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 90 विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.