Phil Simmons : वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमॉन्स यांनी दिला राजीनामा

West Indies Coach Phil Simmons Resignation
West Indies Coach Phil Simmons Resignation esakal
Updated on

West Indies Coach Phil Simmons Resignation : वेस्ट इंडीज टी 20 वर्ल्डकप 2022 च्या पात्रता फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर आता संघाचे प्रशिक्षक फिल सिमॉन्स यांनी प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते वर्षाच्या शेवटची हे पद सोडतील. याबाबत सिमॉन्स म्हणाले की, 'हा पराभव समजण्यापलिकडचा आहे. मी चाहत्यांची माफी मागतो.' सिमॉन्स ऑस्ट्रेलियावरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर प्रशिक्षक पद सोडणार आहेत.

West Indies Coach Phil Simmons Resignation
T20 World Cup 2022 : सरावासाठी 42 किमी प्रवास; आयोजकांचा टीम इंडियाला थकवण्याचा प्लॅन?

सिमॉन्स यांनी वेस्ट इंडीजचे प्रशिक्षकपद 2015 पासून सांभाळले आहे. त्यांनी दोन वेगवेगळ्या कार्यकाळासाठी हे पद सांभाळले. त्यांच्या कार्यकाळात 2016 मध्ये वेस्ट इंडीजने दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्डकपवर आपले नाव कोरले होते. त्यांनी इडन गार्डनवर टी 20 वर्ल्डकपची ट्रॉफी उंचवली होती.

यंदाच्या ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीजने निराशाजनक कामगिरी केली. वेस्ट इंडीजने पात्रता फेरीतील तीन सामन्यांपैकी फक्त 1 सामना जिंकला होता. त्यामुळे त्यांना पात्रता फेरीतच गाशा गुंडाळून मायदेशी परतावे लागले. आता 59 वर्षाचे प्रशिक्षक सिमॉन्स वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर सिमॉन्स हे पद सोडणार आहेत.

West Indies Coach Phil Simmons Resignation
Virat Kohli : ...म्हणून विराटनं टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी; शोएबचा अजब सल्ला

सिमॉन्स म्हणाले की हा निर्णय फक्त वेस्ट इंडीज टी 20 वर्ल्डकपमधून पात्रता फेरीत बाहेर पडला म्हणून घेण्यात आलेला नाही. ते बऱ्याच काळापासून पद सोडण्याबात विचार करत होते. सिमॉन्स म्हणाले की, 'मला माहिती आहे की फक्त संघाचे नाही तर देशाचे देखील नुकसान होत आहे. हे खूप निराशाजनक आहे. आम्ही चांगला खेळ करू शकलो नाही. आता आम्हाला स्पर्धा बाहेर बसून बघावी लागणार आहे. याबाबत मी चाहत्यांची माफी मागतो.'

ते पुढे म्हणाले की, 'माझ्या वैयक्तिक दृष्टीकोणातून मी पद सोडण्याचा निर्णय हा भावनेच्या भरात घेतलेला नाही. मी गेल्या काही काळापासूनच याचा विचार करत होतो. आता मी हा सार्वजनिक करत आहे. मी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर वेस्ट इंडीजच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा देणार आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.