Rohit Sharma Injury Update : रोहित शर्माने अंगठा दुखावला असातना देखील जोखीम घेत भारतासाठी शेवटपर्यंत लढत दिली. रोहित खेळत असताना त्याची दुखापत तितकी गंभीर नसल्याचे भासत होते. मात्र प्रशिक्षक राहुल द्रविडने सामन्यानंतर रोहितच्या दुखापतीबाबत अधिक माहिती दिली आहे. राहुल द्रविडने रोहित शर्मा मुंबईसाठी रवना होणार आहे असे सांगितले.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माच्या दुखापतीबाबत बोलताना प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला की, रोहित शर्मा आपल्या दुखऱ्या अंगठ्यावर तज्ज्ञांचे मत घेण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहे. याचबरोबर रोहित शर्मा कसोटी मालिकेसाठी देखील परतेल की नाही याबाबत शाश्वती नाही.'
दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने भारताचा 5 धावांनी पराभव करत मालिकेत 2 - 1 अशी आघाडी घेतली. बांगलादेशने ठेवलेल्या 272 धावांचा पाठलाग करताना भारताने 50 षटकात 9 बाद 266 धावांपर्यंतच मजल मारली. भारताकडून श्रेयस अय्यरने 83 धावांची झुंजार खेळी केली. त्याला अक्षर पटेलने 56 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत जखमी रोहित शर्माने 28 चेंडूत नाबाद 51 धावा ठोकत अशक्यप्राय वाटणारा विजय आवाक्यात आणला. मात्र शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 6 धावांची गरज असाताना रोहितला षटकार मारण्यात अपयश आले.
बांगलादेशने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2 - 0 अशी विजय आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 10 डिसेंबरला चितगावला होणार आहे. तर दोन कसोटी सामन्यांची मालिका 14 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 14 डिसेंबर ते 18 डिसेंबर आणि दुसरी कसोटी 22 ते 26 डिसेंबर दरम्यान होणार आहे.
हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.