US Open Final : 19 वर्षीय कोको गॉफने रचला इतिहास! जिंकले पहिले ग्रँड स्लॅम

first Grand Slam Coco Gauff US Open 2023
first Grand Slam Coco Gauff US Open 2023
Updated on

Coco Gauff US Open 2023 : 19 वर्षीय अमेरिकन टेनिसपटू कोको गॉफने शनिवारी बेलारूसच्या आर्यना सबालेन्का हिचा पराभव करून यूएस ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. गॉफचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.

आर्थर अॅशे स्टेडियमवर 28,143 प्रेक्षकांसमोर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गॉफची सुरुवात चांगली झाली नाही. त्याने पहिला सेट 2-6 असा गमावला. त्यानंतर प्रेक्षक सबालेन्काचा जय घोष करताना दिसले.

मात्र, दुसऱ्या सेटमध्ये खेळ फिरला. गॉफने दुसरा सेट 6-3 असा जिंकताच ती घरच्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तब्बल 2 तास 6 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात 2-6, 6-3, आणि 6-2 असा विजय मिळवला.

first Grand Slam Coco Gauff US Open 2023
Ind vs Pak : हाय-व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानच्या प्लेइंग-11ची घोषणा! 'हा' स्टार खेळाडू बाहेर

कोको गॉफ ही 1999 मध्ये सेरेना विल्यम्सनंतर देशातील प्रमुख टेनिस स्पर्धा जिंकणारी पहिला अमेरिकन युवा खेळाडू आहे. वयाच्या 15व्या वर्षी गॉफ विम्बल्डन इतिहासातील सर्वात युवा पात्र ठरली आणि 2019 मध्ये तिच्या ग्रँड स्लॅम पदार्पणात चौथी फेरी गाठली.

गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत ती पोहोचली होती पण तिला विजेतेपद मिळवता आले नाही. या वर्षी जुलैमध्ये ती विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत पराभूत होऊन बाहेर पडली होती.

यूएस ओपनचे विजेतेपद पटकावल्यानंतर कोको गॉफने तिच्या टीकाकारांवर निशाणा साधला. गॉफ म्हणाली की, “ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही त्यांचे आभार. एक महिन्यापूर्वी मी (टूर) विजेतेपद जिंकले आणि लोकांनी सांगितले की मी तिथेच राहीन. "दोन आठवड्यांपूर्वी मी आणखी एक विजेतेपद जिंकले आणि लोक म्हणत होते की ते गॉफचे सर्वात मोठे विजेतेपद असेल आणि आता तीन आठवड्यांनंतर, मी ही ट्रॉफी घेऊन आली आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()