Asia Cup 2023 : कोलंबोतील हवा पुन्हा बदलली; गुरुवारी मुसळधार पाऊस; भारतीयांचा इनडोअर सराव

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये सुपर फोरचा पाक आणि बांगलादेश यांच्यातील सामना बुधवारी झाला आता अंतिम सामन्यासह उर्वरित सुपर फोरचे सामने कोलंबोत
Asia Cup 2023
Asia Cup 2023sakal
Updated on

कोलंबो : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील सुपर फोरच्या लढतीत पावसाचा दिलासा असेल, असा अंदाज हवामान खात्याकडून कालच व्यक्त करण्यात आला होता, मात्र आज पुन्हा हवा बदलली. दिवसभर पाऊस होता. त्यामुळे भारतीय संघाने इनडोअर सराव केला.

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये सुपर फोरचा पाक आणि बांगलादेश यांच्यातील सामना बुधवारी झाला आता अंतिम सामन्यासह उर्वरित सुपर फोरचे सामने कोलंबोत नियोजित आहे. गुरुवात आणि शुक्रवार विश्रांतीचे दिवस आहेत,

पण शनिवारपासून हे सामने सुरू होणार आहेत. गुरुवारी मात्र कोलंबो शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. शनिवारपासून हवामानात सुधारणा होईल, अशी आशा मात्र संयोजकांनी कायम ठेवली आहे.

इनडोअर सुविधा असलेल्या ठिकाणी केएल राहुलचा सराव हे वैशिष्ट्य ठरले. आशिया करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघासोबत दाखल झाल्यानंतर राहुलने प्रथमच सहकाऱ्यांसह सराव केला. राहुलसह, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल आणि शार्दुल ठाकूर यांच्या सरावावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांचे जातीने लक्ष होते.

केएल राहुल मार्च महिन्यात अखेरचा एकदिवसीय सामना खेळलेला आहे. त्यानंतर आयपीएलमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याची दुखापत तीव्र झाली आणि त्याला मे महिन्यात शस्त्रक्रियेचा सामना करावा लागला.

राहुलला थ्रो डाऊनवर जास्त सराव देण्यात आला. ओव्हर दि विकेट डावखुरी वेगवान गोलंदाजी खेळता यावी याचा सराव राहुलसाठी देण्यात आला. फलंदाजीचा असा सराव करणाऱ्या राहुलने मात्र यष्टीरक्षणाचा सराव केला नाही. त्यामुळे त्याला लगेचच शनिवारी होणाऱ्या पाकविरुद्धच्या सामन्यात खेळवले जाण्याची शक्यता कमी आहे.

भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरत असलेला पाकचा डावखुरा वेगवान गोलंदाज शहीन शाह आफ्रिदीचा सामना करण्याच्या दृष्टीने शुभमन गिलनने आज सराव केला. आयपीएल गाजवणाऱ्या गिल पाकच्या आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांच्याविरुद्ध चाचपडत होता.

साखळी सामन्यात गिलला पाकच्या या त्रयीविरुद्ध ३२ चेंडूंत १० धावाच करता आल्या होत्या. आजच्या थ्रो डाऊच्या सरावात गिल डावा पाय पुढे काढत चेंडू खेळत हाता. सराव झाल्यानंतर त्याने सरावातील चित्रिकरणाचा अभ्यास केला. त्याच्यासोबत फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोर मार्गदर्शन करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.