Colonel C. K. Nayudu Trophy Domestic Cricket Championship : सामना अनिर्णित राखण्यात महाराष्ट्र संघाला यश

राजकोट येथे झालेल्या कर्नल सी. के. नायडू करंडक (२३ वर्षांखालील) साखळी क्रिकेट स्पर्धेत अनिकेत नलावडे आणि हर्षल काटेने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्र विरुद्धच्या लढतीत महाराष्ट्राने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले.
Colonel C. K. Nayudu Trophy domestic cricket championship
Colonel C. K. Nayudu Trophy domestic cricket championshipsakal
Updated on

पुणे : राजकोट येथे झालेल्या कर्नल सी. के. नायडू करंडक (२३ वर्षांखालील) साखळी क्रिकेट स्पर्धेत अनिकेत नलावडे आणि हर्षल काटेने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्र विरुद्धच्या लढतीत महाराष्ट्राने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले.

या चार दिवसीय सामन्यात सौराष्ट्राच्या ४६४ धावांना प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राचा पहिला डाव २७८ धावांत आटोपला तर फॉलोऑनच्या नामुष्कीनंतर दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर त्यांची तीन बाद १६१ अशी अवस्था झाली होती. अखेरच्या दिवशी अनिकेत नलावडे आणि हर्षल काटेने सुरेख फलंदाजी करत डावाचा पराभव टाळण्यात यश मिळविले. अनिकेत नलावडेने पहिल्या डावातील शतकी खेळी पाठोपाठ दुसऱ्या डावातही बारा चौकारांसह ८९ धावांची खेळी केली.

हर्षल काटेने शानदार शतकी खेळी करताना १२ चौकार आणि दोन षटकारासह १९६ चेंडूंत १२७ धावा केल्या. खेळ थांबविण्याचा निर्णय झाला तेव्हा महाराष्ट्राने दुसऱ्या डावात ५ बाद ३७३ धावा केल्या होत्या. या अनिर्णित सामन्यातून सौराष्ट्राला पहिल्या डावाच्या आघाडीचे तीन गुण मिळाले. महाराष्ट्राला एका गुणावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राचे दोन सामन्यातून केवळ दोनच गुण झाले आहेत. महाराष्ट्राचा तिसरा सामना २१ ते २४ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गंहुजे येथील मैदानावर आसाम संघाबरोबर होईल.

धावफलक :

सौराष्ट्र संघ - पहिला डाव - (१३३.५ षटकांत) सर्वबाद ४६४ अनिर्णित विरुद्ध महाराष्ट्र - पहिला डाव - (८७.५ षटकांत) सर्वबाद २७८ व दुसरा डाव - (१०४ षटकांत) ५ बाद ३७२ (हर्षल काटे नाबाद १२७ , अनिकेत नलावडे ८९, कौशल तांबे ५०, विकी ओस्तवाल नाबाद ३६, दिग्विजय जाधव ३४, यश जगदाळे २२, डी. गोहिल २-६२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.