बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता स्पर्धेचा फक्त एक दिवस शिल्लक आहेत. रविवारचा दिवस भारतासाठी सुवर्ण दिवस ठरला. रविवारी भारताला ५ सुवर्णांसह एकूण १५ पदके मिळाली. अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला पछाडत चौथ्या स्थानावर पोहोचण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे.(Commonwealth Games 2022 Day 11th India PV Sindhu table tennis hockey)
भारताला आता स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी बॅडमिंटनमधील महिला एकेरी, पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत सुवर्ण जिंकण्याची संधी आहे. त्याच वेळी, बहुतेकांचे लक्ष भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पुरुष हॉकी अंतिम सामन्यावर असेल. जिथे भारताकडे ऑस्ट्रेलियाची सलग ६ वेळा सुवर्णपदक जिंकण्याची बनण्याची मालिका खंडित करण्याची संधी असेल.
बॅडमिंटन (1:20 दुपारी) -
महिला एकेरी अंतिम (पीव्ही सिंधू)
पुरुष एकेरी अंतिम (लक्ष्य सेन, दुपारी 2:10),
पुरुष दुहेरीची अंतिम फेरी (चिराग शेट्टी/सात्विकसाईराज रँकीरेड्डी, दुपारी ३ वाजता)
टेबल टेनिस (3:35 दुपारी) - पुरुष कांस्यपदक सामना (साथियां जी)
पुरुष सुवर्णपदक (शरथ कमल, दुपारी ४:२५)
पुरुष हॉकी (दुपारी 5) - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल
रविवारी दणदणीत यश
भारतासाठी रविवार बॉक्सिंग, टेबल टेनिस आणि ऍथलेटिक्समध्ये यशस्वी ठरला. बॉक्सिंगमध्ये भारताने चारपैकी तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून पदकतालिकेत आपले स्थान मजबूत केले. त्याचबरोबर ऍथलेटिक्समध्ये सर्वांना चकित करत तिहेरी उडीत सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले. ऍथलेटिक्समध्ये रविवारी १ सुवर्ण, २ रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण ४ पदके आली. टेबल टेनिसमध्ये ही एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक भारताच्या पदरात पडले. भारतीय महिला क्रिकेट संघाने देखील रौप्य पदक जिंकले.
पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाचे ६५ सुवर्णपदकांसह १७२ पदके मिळवून वर्चस्व कायम आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी अनुक्रमे इंग्लंड (५५ सुवर्ण/ १६६ पदके) व कॅनडा (२४ सुवर्ण/ ८९ पदके) आहेत. चौथ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडच्या नावे १८ सुवर्णपदके आहेत. तर पाचव्या स्थानी असलेल्या भारताच्या नावावर रविवारपर्यंत १७ सुवर्ण, १५ रौप्य व २२ कांस्यपदके जमा होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.