Commonwealth Games 2022 Day 5 : भारताच्या पदरात दोन सुवर्ण तर दोन रौप्य

Commonwealth Games 2022 Day 5 Live Update India Schedule Medal Tally
Commonwealth Games 2022 Day 5 Live Update India Schedule Medal Tallyesakal
Updated on

Birmingham 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेच्या पाचव्या दिवशी (Commonwealth Games 2022 Day 5) भारताने लॉन बॉल महिला (4) सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घालत इतिहास रचला. लॉन बॉलमध्ये भारताचे हे पहिले वहिले राष्ट्रकुल पदक आहे. त्याचबरोबर भारतीय बॅडमिंटन संघाने देखील सिंगापूरचा 3 - 1 असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. तर वेटलिफ्टिंगमध्ये विकास ठाकूरने 96 किलो वजनीगटात भारताला रौप्य पदक मिळवून दिले. त्यानंतर बॅडमिंटन मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाच्या सामन्यात मलेशियाने भारताचा 3 - 1 असा पराभव केला. त्यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताने पाचव्या दिवशी दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची अशी चार पदकांची कमाई केली. भारताची पदकसंख्या आता 13 झाली आहे.

बॅडमिंटन : मलेशियाने सुवर्णाची आशा मिळवली धुळीस 

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला सिंगल्समध्ये जीन वे गोचा 22-20, 21-17 असा पराभव केला. यामुळे भारताने सुवर्ण पदकाच्या सामन्यात मलेशियाशी 1 - 1 अशी बरोबरी केली होती. मात्र पुरूष एकेरीत किदंबी श्रीकांत 21-19, 6-21, 21-16 असा पराभूत झाला. त्यामुळे मलेशियाने पुन्हा मलेशियाने 2 - 1 अशी आघाडी घेतली.

बॅडमिंटन : सिंधूने साधून दिली बरोबरी

मलेशिया विरूद्धच्या मिश्र सांघिक प्रकारात भारताने सुवर्ण पदकाच्या सामन्यात 1 - 1 अशी बरोबरी साधली. पुरूष दुहेरीचा सामना हरल्यानंतर भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला सिंगल्समध्ये जीन वे गोचा 22-20, 21-17 असा पराभव केला.

वेटलिफ्टिंग :उशा बानूरकडून निराशा

वेटलिफ्टिंग महिला 87 किलो वजनीगटात भारताच्या उशा बानूरने स्नॅच प्रकारात पहिल्या प्रयत्नात 90 किलो वजन उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात पाच किलो वजन वाढवून 95 किलोचा भार यशस्वीरित्या पेलला. मात्र तिसऱ्या प्रयत्नात उशाला 98 किलोचा भार पेलवला नाही. तिने क्लीन अँड जर्कमध्ये 110 किलो वजन उचलले. ती एकूण 205 किलो वजन उचलून सहाव्या क्रमांकावर राहिली.

स्क्वाश : सौरभ घोषालला सेमी फायनलमध्ये पराभवचा धक्का, कांस्य पदकासाठी लढणार

भारताचा आघाडीची स्क्वाशपटू सौरभ घोषालला न्यूझीलंडच्या पॉल कोलने पुरूष एकेरीच्या सेमी फायनलमध्ये 9-11, 411, 1-11 असे पराभूत केले. आता सौरभला कांस्य पदकसाठी लढावे लागणार आहे.

बॅडमिंटन : पुरूष दुहेरीत भारताचा पराभव

बॅडमिंटन मिश्र सांघिक प्रकारात भारत आणि मलेशिया सुवर्ण पदकासाठी भिडले. पहिला सामना पुरूष दुहेरीचा झाला. त्यात भारताच्या सात्विक रंकरेड्डी आणि चिराग शेट्टीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना तेंग फाँग आणि वूई सोह या मलेशियन जोडीने 18ृ21, 15-21 असे पराभूत केले. मलेशियाने सध्या 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे.

बॅडमिंटन : सांघिक सुवर्णासाठी सामना सुरू 

बॅडमिंटन मिश्र सांघिकच्या सवर्ण पदकासाठी भारत आणि मलेशिया भिडत आहेत. यातील पहिला पुरूष दुहेरीचा सामना सुरू झाला असून सात्विक साईराज रंकरेड्डी आणि चिराग शेट्टी भारताचे आव्हान सादर करत आहेत

टेबल टेनिस : पुरूष सांघिक संघाने जिंकले सुवर्ण 

भारतीय टेबलटेनिस पुरूष संघाने सिंगापूरचा 3 - 1 असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. या बरोबरच भारताची सुवर्णसंख्या ही 5 पर्यंत पोहचली.

वेटलिफ्टिंग : 96 किलो विकास ठाकूरला रौप्य

विकास ठाकूरने स्नॅच प्रकारात 155 किलो वजन उचलल्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये त्याने पहिल्याच प्रयत्नात 187 किलो आणि दुसऱ्या प्रयत्नात 191 किलो वजन उचलले. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात 198 किलो वजन उचलण्याचा त्याचा प्रयत्न फसला.

टेबल टेनिस : सांघिक अंतिम फेरी

टेबल टेनिस सांघिक अंतिम फेरीत पुरूष एकेरीत भारताच्या अचनता शरथ कमलला पराभवाचा धक्का बसला. सिंगापूरच्या झहे यू चेव्हने त्याचा 7-11, 14-12, 9-11 असा पराभव केला. त्यामुळे सुवर्ण पदकाच्या शर्यतीत भारत आणि सिंगापूर यांची 1 - 1 अशी बरोबरी झाली.

 वेटलिफ्टिंग : 96 किलो पुरूष अंतिम फेरी

96 किलो पुरूष वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या विकास ठाकूरने स्नॅच प्रकारातील पहिल्या प्रयत्नात 149 किलो वजन उचलून यशस्वी सुरूवात केली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 153 किलो वजन उचलले. स्नॅच प्रकारातील तिसऱ्या प्रयत्नात विकास ठाकूरने 155 किलो वजन उचलले.

लॉन बॉल्स : भारताला ऐतिहासिक सुवर्ण पदक

भारतीय महिला (4) लॉन बॉल संघाने दक्षिण आफ्रिकेचा 17 - 10 असा पराभव करत इतिहास रचला. त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील आपले पहिले वहिले सुवर्ण पदक जिंकले.

लॉन बॉल्स : भारतीय संघची आघाडी

भारताने 13 व्या एंडनंतर दक्षिण आफ्रिकेवर 12 - 10 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर 14 व्या एंडनंतर भारताने ही आघाडी 15 - 10 अशी नेली.

टेबल टेनिस : पुरूष सांघिक प्रकारात भारताचा विजय

टेबल टेनिस पुरूष सांघिक प्रकारात भारताने पुरूष सुवर्ण पदकाच्या सामन्यात हरमीत देसाई आणि सातिया जी यांनी सिंगापूरच्या योंग क्वेक आणि येव पँगचा 13 - 11, 11 - 7, 11 - 5 असा पराभव करत 1 - 0 अशी आघाडी घेतली.

 लॉन बॉल्स : पिछाडी भरून काढत भारत आघाडीवर

लॉन बॉल महिला (4) सुवर्ण पदकाच्या सामन्यात 11 व्या एंडनंतर दक्षिण आफ्रिकेने भारतावर 10 - 8 अशी आघाडी घेतली. त्यानंतर 12 व्या एंडनंतर भारताने ही पिछाडी भरून काढत सामना 10 - 10 असा बरोबरीत आणला.

टेबल टेनिस : पुरूष सांघित सुवर्ण पदक सामना 

टेबल टेनिस पुरूष सांघिक प्रकारात भारत आणि सिंगापूर यांच्यात सुवर्ण पदकासाठीचा सामना सुरू आहे. सध्या भारत 13 - 11 आणि 11 - 8 असे दोन गेम जिंकत आघाडीवर आहे.

100 मीटर धावणे : द्युती चंद हीट राऊंडमध्येच गारद

भारताची धावपटू द्युती चंद महिला 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरली.

लॉन बॉल्स : दहाव्या एंडनंतर आफ्रिकेचे जोरदार कमबॅक

दक्षिण आफ्रिकेने लॉन बॉल्स महिला (4) सुवर्ण पदकाच्या सामन्यात जबरदस्त कमबॅक केले. दक्षिण आफ्रिकेने भारताविरूद्धची 2 - 8 अशी पिछाडी भरून काढत दहाव्या एंडपर्यंत सामना 8 - 8 असा बरोबरीत आणला.

लॉन बॉल्स :  8 व्या एंडपर्यंत भारत आघाडीवर

भारती महिला लॉन बॉल्स 4 महिला संघाने सुवर्ण पदकाच्या सामन्यात आठव्या एंडनंतर दक्षिण आफ्रिकेवर 8-4 अशी आघाडी मिळवली आहे.

लॉन बॉल्स : भारतीय संघ आघाडीवर

लॉन बॉल्स महिला (4) सुवर्ण पदकाच्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका 2 - 2 असा बरोबरीत होती. त्यानंतर भारतीय संघाने 4 - 2 अशी आघाडी घेतली.

लॉन बॉल्स : महिला अंतिम सामना सुरू

लॉन बॉल्स 4 महिला सुवर्ण पदकासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे.

अॅथलेटिक्स : महिला गोळाफेक

भारताची मनप्रीत कौरने महिला गोळा फेकीच्या पात्रता फेरती 16.78 मीटर लांब गोळा फेकून अंतिम फेरी गाठली.

वेटलिफ्टिंग : तांत्रिक करणामुळे हुकले पुनमचे पदक

पुनम यादवचा क्लीन अँड जर्क प्रयत्नात 116 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर दुसरा प्रयत्नात देखील 116 किलो वजन उचलण्याचा तिचा प्रयत्न फसला.तांत्रिक कारणामुळे तिचा दुसरा लिफ्ट देखील अवैध ठरवण्यात आला. त्यानंतर तिने तिसरा लिफ्ट यशस्वीरित्या उचलला मात्र बारबेल बझर वाजण्यापूर्वीच खाली टाकल्याने तांत्रिकदृष्ट्या तिचा तिसरा लिफ्ट ग्राह्य धरण्यात आला नाही. क्लीन अँड जर्कमधील तीनही प्रयत्न अवैध ठरल्यामुळे पुनम यादवचे पदक हुकले.

लांब उडी :

पुरूष लांब उडीच्या पात्रता फेरीत भारताच्या मुरली श्रीशंकरने 8.05 मीटर लांब उडी मारत अंतिम फेरी गाठली. याचबरोबर मोहम्मद अनीस याहियाने देखील लांब उडीत अंतिम फेरी गाठली. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 7.78 मीटर लांब उडी मारली.

वेटलिफ्टिंग : पुनम यादवने स्नॅच प्रकारातील कामगिरी

76 किलो महिला वेटलिफ्टिंमध्ये भारताच्या पुनम यादवने स्नॅच इव्हेंटमध्ये दुसऱ्या प्रयत्नात 95 तर तिसऱ्या प्रयत्नात 98 किलो वजन उचलले. स्नॅच प्रकारात कॅनडाच्या माया लेयलोरने 100 किलो वजन उचलून अव्वल स्थान पटकावले. तर पुनम यादव दुसऱ्या स्थानावर राहिली.

वेटलिफ्टिंग : पुनम यादव 2018 ची पुनरावृत्ती करण्यास सज्ज

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सनी दमदार कामगिरी केली आहे. आज महिला 76 किलो वजनीगटात पुनम यादव आपली दावेदारी सादर करणार आहे. पुनमने 2018 च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण तर 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते.

लॉन बॉल भारताच्या महिला न्यूझीलंडला भिडणार

लॉन बॉलमध्ये भारतीय महिलांची दुहेरी आणि तिहेरी जोडी न्यूझीलंड बरोबर भिडणार आहे.

लॉन बॉलचे गुण कसे मिळतात?

लॉन बॉलमध्ये ज्या संघाचे जास्तीजास्त बॉल हे 'जॅक' च्या जवळ असतील तो संघ जिंकतो. समजा जर 'अ' संघाचे 'ब' संघाच्या जॅकच्या जवळ असलेल्या एका बॉलपेक्षा जास्त दोन बॉल प्लेस केले. तर अ संघाला दोन गुण मिळतील. तसेच तीन बॉल प्लेस केले तर तीन गुण मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.