भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लोव्हलिना बोरगोहैनला पराभवाचा धक्का बसला आहे. उपांत्यपूर्व फेरीत 70 किलो वजनी गटात वेल्सच्या रोजी एक्लेसने लोव्हलिनाचा 2 - 3 असा पारभव केला.
भारताचा वेटलिफ्टर गुरदीप सिंगने (Gurdeep Singh) 109 + किलो वजनी गटात कांस्य पदकाला गवसणी घातली. गुरदीपने जिंकलेल्या पदकामुळे भारताची वेटलिफ्टिंगमधील (Weightlifting) पदक संख्या दुहेरी आकड्यात म्हणजेच 10 पदकांवर पोहचली आहे.
भारताची स्टार बॉक्सर निखत झरीनने महिला 50 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत वेल्सच्या हेलेन जोनेसचा पराभव करत सेमी फायनल गाठली. तिने भारताचे बॉक्सिंगमधील कांस्य पदक पक्के केले.
ज्यूदो महिला 78 किलो वजनीगटाताच्या अंतिम सामन्यात स्कॉटलंडच्या साराह अॅडलिंग्टनने भारताच्या तुलिका मानचा पराभव केला. त्यामुळे तुलिका मानला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र तुलिकाच्या रूपाने भारतीय महिला ज्यूदोपटूंनी दुसरे रौप्य पदक पटकावले. यापूर्वी सुशिला देवीने देखील रौप्य पदकाची कमाई केली होती.
तुलिका मानविषयी आणखी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
भारताच्या सौरभ घोसालने पुरूष एकेरी स्क्वाश स्पर्धेत भारताला पहिले वहिले पदक जिंकून दिले. त्याने इंग्लंडच्या जेम्स विलट्रॉपचा 11-6, 11-1,11-4 असा पराभव केला.
पुरूष वेटलिफ्टिंग 109 + किलो वजनी गटात भारताचा गुरदीप सिंग आपली पकदाची दावेदारी सादर करणार आहे. गुरदीपने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 388 किलो वजन उचलले होते. त्यामुळे त्याच्याकडून राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची आशा आहे.
महिला 87 + किलो वजनी गटात भारताच्या पुर्णिमा पांडेने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात एकूण 228 किलो वजन उचलले. ती पदकांच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. ती पदकाच्या शर्यतीत सहाव्या स्थानावर राहिली.
पुरूष हॉकीमध्ये भारतीय संघाने कॅनडावर तिसऱ्या क्वार्टरपर्यंत 5 - 0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर चौथ्या आणि अखेरच्या क्वार्टरमध्ये भारताने अजून तीन गोल दागत सामना 8 - 0 असा जिंकला. भारताचा हा 'ब' गटातील दुसरा विजय आहे.
महिला 87 किलो वजनी गटात पुर्णिमा पांडेने स्नॅच प्रकारात पहिल्या प्रयत्नात 103 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न फसला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात पुर्णिमाने 103 किलो वजन उचलत दमदार सुरूवात केली. त्यानंतर पुर्णिमाने तिसऱ्या प्रयत्नात 108 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला अपयश आले. त्यामुळे स्नॅच प्रकारात तिने 103 किलो वजन उचलले.
भारतीय पुरूष संघाची कॅनडावर 4 - 0 अशी आघाडी
भारताची पुर्णिमा पांडे महिला वेटलिफ्टिंगच्या 87 किलो वजन गटात आपली अंतिम फेरीत दावेदारी सादर करणार आहे.
लवप्रीत सिंहने वेटलिफ्टिंगच्या पुरुषांच्या 109 किलोग्राम वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याने त्याचे अभिनंदन. युवा आणि गतिमान लवप्रीत सिंहनं त्यांच्या शांत स्वभावानं आणि खेळातील समर्पणानं सर्वांना प्रभावित केले आहे, भविष्यातील पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा.
बॉक्सिंगमध्ये भारताच्या मोहम्मद हुसामुद्दीनने 57 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली आहे. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत नामिबियाच्या ट्रायअगेन मॉर्निंग डेव्हेलोचा 4-1 असा पराभव केला. हुसामुद्दीनने 16 व्या फेरीत बांगलादेशच्या मोहम्मद सलीम हुसेनचा 5-0 असा पराभव केला होता.
वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या विकास ठाकूरने 96 किलो वजनी गट रौप्य पदकाची कमाई केली. त्याने एकूण 346 किलो वजन उचलत भारताला रौप्य पदक पटकावून दिले. विकास ठाकूर खेळांसाठी सिद्धू मूसवालाची गाणी ऐकत आला होता. मूसेवालाच्या हत्येनंतर दोन दिवस अन्न न खाल्लेल्या विकास ठाकूरने या पंजाबी गायकाच्या स्टाईलमध्ये मांडी मारून राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर जल्लोष केला. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय महिला संघाने बुधवारी हॉकीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करत 'अ' गटातील एका रोमहर्षक लढतीत भारताने कॅनडाचा 3-2 असा पराभव केला
नीतू सिंगने महिला बॉक्सिंगच्या 45-48 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली आहे. यासह त्याने किमान कांस्य पदक निश्चित केले आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत उत्तर आयर्लंडच्या निकोल क्लॉइडचा पराभव केला.
भारताच्या तुलिका मानने ज्युदोच्या 78 किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
राष्ट्रकुल 2022 मध्ये भारताने आतापर्यंत 14 पदके जिंकली आहेत. यामध्ये 5 सुवर्ण, पाच रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे.
भारताच्या तुलिका मानने ज्युदोमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. तिने 78 किलो वजनी गटात मॉरिशसच्या ट्रेसी डरहोनचा पराभव केला. उपांत्य फेरीत तिचा सामना न्यूझीलंडच्या सिडनी अँड्र्यूजशी होणार आहे.
हॉकी सामन्यात भारताने हाफ टाइमपर्यंत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारत ही आघाडी लवकरात लवकर वाढवण्याचा प्रयत्न करेल.
Lovepreet Singh wins bronze Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशीही वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय लवप्रीत सिंह पुरूष 109 किलो ग्राम वजनी गटात देशासाठी कांस्यपदक पटकावले आहे. लवप्रीतने स्नॅचमध्ये 163 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 192 किलो असं एकूण 355 किलो वजन उचलून कांस्यपदकावर कब्जा केला. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला नववे पदक मिळाले आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लवप्रीत सिंगने क्लीन अँड जर्कच्या तिसऱ्या प्रयत्नात 192 किलो वजन उचलले. त्याने स्नॅचमध्ये 163 किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने एकूण 355 किलो वजन उचलले.
भारताच्या लवप्रीत सिंगने वेटलिफ्टिंगमध्ये पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. क्लीन अँड जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात त्याने 189 किलो वजन उचलले आहे.
भारताचा लवप्रीत सिंग 109 किलो वजनी गटात आपले आव्हान सादर करत आहे. त्याने स्नॅच राऊंडमध्ये 163 किलो वजन उचलले. त्याचबरोबर क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात त्याने 185 किलो वजन उचलले आहे.
महिला हॉकीमध्ये भारताचा कॅनडा विरुद्ध सामना सुरु झाला आहे. टीम इंडियाचा हा चौथा सामना असून त्यांच्या नजर तिसऱ्या विजयावर आहे.
भारताच्या दीपक देसवालला ज्युदोमध्ये पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याला उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडच्या हॅरी लोवेल हेविटने पराभूत केले.
दीपक देशवालने पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
स्नॅच राऊंडमध्ये लवप्रीत सिंगने 163 किलो वजन उचलले आहे. सर्वाधिक वजन उचलण्याच्या बाबतीत ते संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याच्याशिवाय कॅनडाच्या वेटलिफ्टरने 163 किलो तर समोआच्या वेटलिफ्टरने 164 किलो वजन उचलले आहे.
लवप्रीत सिंगने दुसऱ्या प्रयत्नात 161 किलो वजन उचलले आहे.
लवप्रीतने स्नॅचमध्ये पहिल्याच प्रयत्नात 157 किलो वजन उचलले आहे. यासह तो सुवर्णपदकाचा दावेदार बनला आहे.
भारतीय संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात भारताने 17-10 ने सामना जिंकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली, त्यांच्यासाठी हा प्रवास दिसतो तितका सोपा नव्हता कारण त्यांच्याकडे कोणताही निधी किंवा प्रशिक्षक नव्हता. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लवप्रीत सिंहची वेटलिफ्टिंगमधील स्पर्धा सुरू झाली आहे. पुरुषांच्या 109 किलो वजनी गटात तो आपले पराक्रम दाखवेल.
स्क्वॉशमध्ये सुनैना सारा कुरुविलाचा सामना सुरू झाला आहे. प्लेट फायनल्समध्ये त्यांचा सामना गयाना मेरी फंगशी होणार आहे. कुरुविलाने पहिला गेम 11-7 अशा फरकाने जिंकला.
5 सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ
5 रौप्य: संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ
3 कांस्य: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर
राष्ट्रकुल स्पर्धेच्या पुरूष 96 किलो वजनी गट वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या विकास ठाकूरने रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्याने एकूण 346 किलो वजन उचलत भारताला रौप्य पदक पटकावून दिले. वेटलिफ्टिंगमधून भारताला हे तिसरे रौप्य तर एकूण आठवे पदक मिळाले आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय टेबलटेनिस पुरूष संघाने सिंगापूरचा 3 - 1 असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय महिला लॉन बॉल्स संघाने इतिहास रचला. लॉन बॉल्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय संघ ठरला. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुरुष 109 किलो गट, लवप्रीत सिंह, दुपारी 2:00
महिला 87 किलो गट, पूर्णिमा पांडेय, संध्याकाळी 6:30
पुरुष 109 किलो गट, गुरदीप सिंह, रात्री 11:00
कॉमनवेल्थ गेम्स 2022 ला 5 दिवस उलटले आहेत. पहिल्या 5 दिवसात भारताच्या वेटलिफ्टर्स जबरदस्त वजन उचलून देशाला पदक मिळवून देणारे कमाल दाखवले. त्यांच्याशिवाय लॉन बॉलमध्ये इतिहास रचला गेला. ज्युदोमध्ये भारताला पदक आल तर टेबल टेनिसमध्ये भारताची ताकद दिसून आली. पहिल्या 5 दिवसांनंतर भारत पॉइंट टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरु कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत चार पदकं खिशात घातली आहेत. यामध्ये दोन सुवर्णपदकांसह दोन रौप्य पदकांचा समावेश आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून दरदिवशी पदकं खिशात घालत आहे. भारताचे वेटलिफ्टर दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. आज जिंकलेल्या चार पदकांमुळे भारताची पदकसंख्या 13 वर गेली आहे. तर आज स्पर्धेचा सहावा दिवस जाणून घ्या आजचे शेड्यूल एका क्लिकवर
Commonwealth Games 2022 Day 6 live Updates : कॉमनवेल्थ गेम्सची 22 वी आवृत्ती बर्मिंगहॅममध्ये आयोजित केली जात आहे. सहाव्या दिवशीही वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय लवप्रीत सिंह पुरूष 109 किलो ग्राम वजनी गटात देशासाठी कांस्यपदक पटकावले आहे. लवप्रीतने स्नॅचमध्ये 163 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 192 किलो असं एकूण 355 किलो वजन उचलून कांस्यपदकावर कब्जा केला. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला नववे पदक मिळाले आहे. भारतीय महिला संघाने हॉकीमध्ये कॅनडाचा 3-2 असा पराभव केला.
भारताने 2022 च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये एकूण 14 पदके जिंकली आहेत, ज्यात पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत सहाव्या स्थानावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.