CWG 2022 DAY 7 LIVE: बॉक्सर अमित पांघल-जास्मिनने पदक केले निश्चित

भारताने आतापर्यंत एकूण 18 पदके जिंकली आहेत आणि हा ट्रेंड आजही कायम राहण्याची अपेक्षा आहे.
CWG 2022 DAY 7 LIVE
CWG 2022 DAY 7 LIVEsakal

Commonwealth Games 2022 Birmingham Day 7 Live : आज कॉमनवेल्थ गेम्सचा 7 वा दिवस आहे. भारताने आतापर्यंत एकूण 18 पदके जिंकली आहेत आणि हा ट्रेंड आजही कायम राहण्याची अपेक्षा आहे. अॅथलेटिक्समध्ये लांब उडीपटू अनीस आणि श्रीशंकर यांच्यावर नजर असेल. ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक विजेती शटलर पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या फेरी -32 मध्ये आपला सामना खेळेल. त्याच्याशिवाय बॉक्सर अमित पंघाल 48 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे. बॉक्सिंगशिवाय हॉकी, लॉन बॉल, स्क्वॉश, अॅथलेटिक्स यासारख्या इतर स्पर्धांमध्येही भारत आपला दावा मांडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बॉक्सिंग :

महिला 60 किलो लाईटवेट वजनीगटात भारताच्या जासमिनने न्यूझीलंच्या ट्रॉय गारटॉनचा 4 - 1 असा पराभव करत उंपात्य फेरी गाठली. तिने भारताचे बॉक्सिंगमधील अजून एक कांस्य पदक निश्चित केले.

हॉकी : 

भारतीय महिला हॉकी संघाने कॅनडाचा 3 - 1 असा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

बॉक्सिंग : पांघलने पदक केले निश्चित

बॉक्सिंग 51किलो (फ्लायवेट) वजनीगटात भारताच्या अमित पांघलने स्कॉटलंडच्या लेनॉन मुलिगॅनचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. त्याने भारताचे कांस्य पदक नक्की केले.

बॅडमिंटनमध्ये किदाम्बी श्रीकांतचा सामना सुरू

बॅडमिंटनमध्ये किदाम्बी श्रीकांतचा सामना सुरू झाला आहे. त्याचा सामना युगांडाच्या डॅनियल वेनेगालियाशी होणार आहे.

Hammer Throw : मंजू बाला अंतिम फेरीत

मंजू बालाने हातोडा फेकच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिने 59.68 मीटर फेक केला आणि पात्रता फेरीत 11वे स्थान पटकावले. भारताची दुसरी अॅथलीट सरिताने 57.48 मीटर फेकले आणि अंतिम फेरीसाठी पात्रता गमावली.

बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने बाजी मारली

बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने मालदीवच्या खेळाडूवर एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. सिंधूने फातिमा नब्बाचा 21-4, 21-11 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. यासह त्याने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

बॅडमिंटनमध्ये सिंधूचा सामना मालदीवच्या खेळाडूशी

बॅडमिंटनमध्ये भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधूचा सामना मालदीवच्या फातिमा नबाहाशी होत आहे. सिंधूने पहिला सेट 21-4 अशा फरकाने जिंकला.

हिमा दास 200 मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीत

हिमा दासने 200 मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिने तिची शर्यत 23.42 सेकंदात पूर्ण केली आणि हीटमध्ये पहिले स्थान पटकावले.

Athletics: हॅमर थ्रो इव्हेंट सुरू

सरिता आणि मंजू बाला यांच्यातील सामना हॅमर थ्रोमध्ये सुरू झाला आहे. सरिताने पहिल्याच प्रयत्नात 57.58 मीटर अंतर कापले आहे. त्याचवेळी मंजूची पहिली थ्रो 59.68 मीटर होती.

भारताचे पदक विजेते

  • सुवर्ण 5 : मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ

  • रौप्य 6 : संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान

  • कांस्य 7 : गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर

भारताची 6 व्या दिवशी कामगिरी एका क्लिकवर

कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या सहाव्या दिवशी, भारताने खूप चांगले प्रदर्शन केले आणि एकूण 18 पदके जिंकली आहे. यासह भारत पदकतालिकेत सातव्या स्थानावर आहे. सहाव्या दिवशी भारताची कामगिरी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

माझ्यासाठी अखेरचा Commonwealth Game, पण... सीमा पुनियाचे मोठे वक्तव्य

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चार पदकं नावावर असलेल्या भारताच्या सीमा पुनियाला बर्मिंगहॅम येथे पदकाने हुलकावणी दिली. पाचवे राष्ट्रकुल स्पर्धेचे पदक जिंकण्याचे स्वप्न तिचे अपूर्ण राहिले. या पराभवानंतर ३९ वर्षीय सीमाने भावनिक वक्तव्य केले. माझ्यासाठी ही अखेरची राष्ट्रकुल स्पर्धा असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Commonwealth Games 2022 : नीतू, मोहम्मदने केले पदक पक्के

भारतीय बॉक्सर्सनी बुधवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील आणखी दोन पदके निश्‍चित केली. नीतू गंघास व मोहम्मद हुसामुद्दीन या बॉक्सर्सनी आपापल्या गटात प्रतिस्पर्ध्यांना दमदार पंचेस मारत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयासोबतच दोन्ही बॉक्सर्सनी किमान ब्राँझपदक पक्के केले. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Commonwealth Game : भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत

भारताच्या दोन्ही हॉकी संघांनी बुधवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली. एकीकडे भारताच्या महिला हॉकी संघाने कॅनडावर ३-२ अशा फरकाने विजय साकारत उपांत्य फेरी गाठली; तर दुसरीकडे भारताच्या पुरुष संघाने कॅनडाचा ८-० अशा फरकाने धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीच्या दिशेने पाऊल टाकले. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

CWG 2022 Schedule Day 7: ऍथलीट ते बॉक्सिंग रिंग..7 व्या दिवशीही भारतीय खेळाडूंचा जलवा

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज सातवा दिवस आहे. आज एकूण 15 सुवर्णपदके पणाला लागली आहेत. भारतीय खेळाडू येथे रिदमिक जिम्नॅस्टिक्ससारख्या सुवर्णपदक स्पर्धांमध्येही सहभागी होताना दिसतील. यासोबतच बॉक्सिंगमध्ये भारताचे अनेक खेळाडू बॉक्सिंग रिंगमध्ये उतरणार आहेत. अॅथलेटिक्समध्ये धावणे आणि हातोडा फेकण्यापासून ते बॅडमिंटन आणि टेबल टेनिसपर्यंत भारताचे आज अनेक सामने होणार आहेत. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा