IND vs PAK: भारतीय संघ बर्मिंगहॅमला पोहोचला, पाकिस्तानशी कधी भिडणार ते जाणून घ्या

24 वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.
indian womens cricket team
indian womens cricket team sakal
Updated on

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी भारतीय महिला क्रिकेट (India women's national cricket team) संघ सोमवारी रात्री उशिरा यूकेला पोहोचला. बर्मिंगहॅमला पोहोचल्यानंतर महिला टीम इंडियाचे अनेक फोटो समोर आले आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार आहे. 24 वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

indian womens cricket team
ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याची संधी वाढली!

राष्ट्रकुल खेळांमध्ये क्रिकेटचे सामने टी-20 स्वरूपात खेळवले जाणार आहे. भारतीय संघ मोहिमेला 29 जुलैपासून सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी 29 जुलैला होणार आहे. भारतीय महिला संघ अ गटात आहे. या गटात भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बार्बाडोसचे संघ आहेत. वेस्ट इंडिजचा मूळ संघ बार्बाडोसच्या नावाने खेळतील.

indian womens cricket team
Mithali Raj : मिताली राज 18 वर्षाच्या क्रिकेटपटूची फॅन

भारतीय संघाला ग्रुप स्टेजमध्ये त्यांच्या गटातील तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळायचा आहे. संघाने किमान दोन सामने जिंकल्यास उपांत्य फेरी गाठणे अपेक्षित आहे, तर तीन सामने जिंकल्यास थेट पात्रता मिळेल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर हा सामना रविवारी 31 जुलै रोजी एजबॅस्टन येथे होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()