Commonwealth Games 2022 : बॉक्सर लव्हलिनाने रस्त्यावर घालवली रात्र, काय आहे प्रकरण?

Commonwealth Games 2022 Lovlina Borgohain Left The Inauguration Ceremony Midway Spent night Outside Game Village
Commonwealth Games 2022 Lovlina Borgohain Left The Inauguration Ceremony Midway Spent night Outside Game Village esakal
Updated on

बर्मिंगहम (Commonwealth Games 2022) : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक जिंकून देणारी लव्हलिना बोरगोहैनने (Lovlina Borgohain) राष्ट्रकुल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ (Opening Ceremony) मध्यावरच सोडणे महागात पडले. कराण त्यानंतर तिला जवळपास एक तास ती गेम व्हिलेजच्या बाहेरच रहावे लागले. यापूर्वी लव्हलिनाने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून आपला मानसिक छळ होत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने मध्यस्थी करून तिच्या वैयक्तीक प्रशिक्षकांना गेम व्हिलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला होता.

Commonwealth Games 2022 Lovlina Borgohain Left The Inauguration Ceremony Midway Spent night Outside Game Village
CWG2022 INDW vs AUSW : पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव

राष्ट्रकुल स्पर्धेचा गुरूवारी रात्री उद्घाटन सोहळा पार पडला. हा सोहळा जवळपास दोन तास सुरू होता. दरम्यान भारतीय बॉक्सिंग संघातील सदस्य मुहम्मद हुसामुद्दीनसोबत लव्हलिना अलेक्झांडर स्टेडियमवरून लवकर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याबाबत लव्हलिना म्हणाली की, 'आम्हाला सकाळी सराव करायचा होता. कारण दुसऱ्या दिवसी आमचा सामना आहे. समारंभ सुरू होता त्यावेळी आम्ही तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आम्हाला टॅक्सी उपलब्ध करून देण्यास सांगितले. मात्र आम्हाला टॅक्सी नाही असे सांगण्यात आले.'

उद्घाटन समारंभ अजून सुरू होता आणि या दोन्ही बॉक्सरना टॅक्सी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे गेम व्हिलेजमध्ये पोहचण्याचा मार्गच उपलब्ध नव्हता. अखेर त्यांना राष्ट्रीय प्रदर्शनी केंद्रावरून गेम व्हिलेजला जाणारी बस पकडली. भारतीय संघासाठी आयोजकांनी तीन गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या मात्र या गाड्यांचे चालक जागेवर नव्हते.

Commonwealth Games 2022 Lovlina Borgohain Left The Inauguration Ceremony Midway Spent night Outside Game Village
WI vs IND : टी 20 मालिकेसाठी केएल राहुलच्या जागी संजू सॅमसनची वर्णी

भारतीय संघाचे प्रमुख राजेश भंडारी यांनी या घटनाक्रमावरून नाराजी व्यक्त केली. भंडारी भारतीय बॉक्सिंग महासंघाचे उपाध्यक्ष देखील आहेत. भंडारीने सांगितले की, 'समारंभ सुरू असतानाच मला माहिती झाले की लव्हलिना आणि अजून एक बॉक्सर परत गेले आहेत. आम्ही सर्वजण बसमधून आलो होते. त्यावेळी टॅक्सीचा पर्याय उपलब्ध नव्हता. जर त्यांना लवकरच पोहचायचे होते तर त्यांनी समारंभाला येणे टाळालयला पाहिजे होते.'

ते पुढे म्हणाले की, 'अनेक इतर खेळाडूंनी देखील समारंभाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्यांना पुढच्या दिवशी सराव करायचा होता. त्यानंतर त्यांना स्पर्धा देखील खेळायची होती. मी याबाबतीत बॉक्सिंग संघाशी बोलणार आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.