बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानने पहिल्यांदाच सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. पाकिस्तानचा वेटलिफ्टर मुहम्मद नूह बटने ४०५ किलो वजन उचलून सुपर्ण कामगिरी केली. राष्ट्रकुल 2022 मधील कोणत्याही प्रकारात पाकिस्तानचे हे पहिले सुवर्णपदक आहे. तर भारताच्या गुरदीप सिंगने १०९ किलो वरील गटात एकूण ३९० किलो वजन उचलले आणि कांस्यपदक पटकावले. त्यानंतर पाकिस्तानसह भारतीयांनीदेखील मुहम्मद नूह बटचे कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्ताननेदेखील गुरदीप सिंगचे कौतुक केले.(Commonwealth Games 2022 Pakistan, India fans praise Nooh, Gurdeep after Commonwealth triumph)
नूह बटने पहिल्या स्नॅच राऊंडमध्ये १७३ किलो वजन उचलले आणि दुसऱ्या क्लिन एंड जर्क राऊंडमध्ये २३२ किलोचे वजन उचलत पहिले स्थान पटकावले.
पाकिस्तानसाठी पहिले सुवर्णपदक जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बटचे अभिनंदन केले आणि देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. नेटकऱ्यांनीदेखील त्याचे कौतुक केले आहे.
इतकेच नव्हे तर पाकिस्तानच्या नेटकऱ्यांनी बट आणी गुरदीप या दोघांचेही कौतुक केले आहे. एक नेटकऱ्याने दोघांचा फोटो शेअर करत अरशद नदीम आणि नीरच चौप्राची आठवण आली असल्याचे म्हटले आहे.
तसेच भारतीयांनीदेखील ट्विट करत दोघांचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर दोन्ही देशातील मैत्री पाहायला मिळाली.
ऐतिहासिक विजयानंतर बटने आपले पदक वडिलांना समर्पित केले. त्यांच्या १२ वर्षाच्या मेहनीतीमुळे मी यश प्राप्त करु शकलोय. अशी भावना बटने व्यक्त केली आहे.
पंजाबमधील खन्नाजवळील माजरी रसुलरा गावातील २६ वर्षीय शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या गुरदीप सिंगने पोडियम फिनिशसाठी ३९०kg (१६७kg+ २२३kg) साठी सर्वोत्तम प्रयत्न केले आणि हेवीवेट प्रकारात भारताला पहिले पदक मिळाले. आपल्या २२३ किलो क्लीन अँड जर्कच्या प्रयत्नाने सिंगने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आणि स्वतःचा राष्ट्रीय विक्रमही लिहिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.