CWG 2022 : भारतीय महिला टेबल टेनिस टीम स्पर्धेतून बाहेर

Defending Champions India Out Of Women's Team Event In Table Tennis
Defending Champions India Out Of Women's Team Event In Table Tennisesakal
Updated on

स्टार खेळाडू मनिका बत्राच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ शनिवारी उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागल्यानंतर राष्ट्रकुल महिलांच्या टेबल टेनिस सांघिक स्पर्धेतून बाहेर पडला. (Defending Champions India Out Of Women's Team Event In Table Tennis)

भारताची स्टार खेळाडू मनिका बत्रा हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला टेबल टेनिस संघाला ग्रुप मॅचमध्ये विजय मिळाला होता. मात्र शनिवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या संघाकडून भारतीय महिला टेबल टेनिस संघाला पराभव पत्करावा लागला आहे.

अंतिम आठच्या सामन्यात भारताला मलेशियाच्या कठोर आव्हानाला सामोरं जावं लागलं. यात भारतीय संघाचा पराभव झाला. त्यामुळे कॉमनवेल्थ स्पर्धेतून महिला टेबल टेनिस संघ बाहेर पडला आहे.

रीथ टेनिसन आणि श्रीजा अकुला या महिला दुहेरीच्या जोडीला सलामीच्या लढतीत 1-3 (7-11, 6-11, 11-5, 6-11) ने पराभव पत्करावा लागला आणि भारतीय संघ सुरुवातीपासूनच बॅकफूटवर गेला. मात्र, मनिकाने यिंग हो हिचा 3-2 (11-8, 11-5, 8-11, 9-11, 11-3) असा चुरशीच्या लढतीत पराभव करून भारताला बरोबरी साधून दिली.

त्यानंतर दुहेरीतील पराभवाची पूर्तता अकुलाने केली आणि दुसऱ्या एकेरीत ली सियान एलिस चँगचा 3-0 (11-6 11-6 11-9) पराभव करून भारताला 2-1 ने विजय मिळवून दिला. मनिकाने मात्र मलेशियाला केरेन लाइनविरुद्ध 0-3 (6-11 3-119-11) अशी बरोबरी साधण्याची संधी दिली.

मलेशियाने या गतीचा फायदा घेत भारतीय संघाला निर्णायक सामन्यात 3-2 (10-12 11-8 6-11 11-9 11-9) असे पराभूत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()