CWG 2022 : आठ दिवसांवर भारत - पाक सामना तरी खेळाडूंना ना किट ना व्हिसा

Commonwealth Games Six Indian Women's Cricket Team Player Not Get Visa and Kit
Commonwealth Games Six Indian Women's Cricket Team Player Not Get Visa and Kit ESAKAL
Updated on

नवी दिल्ली : बर्मिंगहममध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतील (Commonwealth Games) सहभागी खेळाडू रवाना होण्यासाठी फक्त 48 तास शिल्लक असतानाही भारतीय महिला क्रिकेट संघातील (Indian Women's Cricket Team) सहा खेळाडूंना अजून व्हिसा (Visa) मिळालेला नाही. महिला क्रिकेट राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करत आहे. भारतीय संघ सध्या बंगळुरू येथे सराव करत असून संघ रविवारी बर्मिंगहमसाठी रवाना होणार आहे.

Commonwealth Games Six Indian Women's Cricket Team Player Not Get Visa and Kit
Sunil Gavaskar : इंग्लंडमधील स्टेडियमला आता सुनिल गावसकरांचे नाव

बीसीसीआय (BCCI) व्हिसाच्या मुद्यावरून भारतीय ऑलिम्पिक संघाशी (IOA) संपर्कात आहे. आयओएच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, 'काही व्हिसा आता मिळाले आहेत मात्र सहा व्हिसा अजून मिळालेले नाहीत. यात तीन खेळाडू आणि तीन सहयोगी स्टाफचे व्हिसा आहेत. उरलेले व्हिसा हे उद्या मिळायला हवेत. तसंही या प्रक्रियेवर आमचे कोणतेच नियंत्रण नाही. इंग्लंडमध्ये उन्हाळा सुरू असल्याने ब्रिटनचा व्हिसा मिळवण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे वेळ लागत आहे.'

Commonwealth Games Six Indian Women's Cricket Team Player Not Get Visa and Kit
Asia Cup 2022 थीम सॉंग रिलीज, चाहत्यांनी व्हिडिओला घेतले डोक्यावर

व्हिसा मिळणे जरी हातात नसले तरी खेळाडूंचे किट मिळायला काही हरकत नव्हती. मात्र खेळाडूंचे किट देखील अजून बंगळुरूमध्ये पोहचलेले नाहीत. आयओएच्या अधिकाऱ्यांनी शनिवारपर्यंत हे किट मिळतील असे आश्वासन दिले आहे. बीसीसीआयने 28 जुलैपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली होती.

भारतीय महिला क्रिकेट संघ 29 जुलैपासून आपली राष्ट्रकुल मोहिम सुरू करेल. त्यांच्या पहिला सामना 29 जुलैला ऑस्ट्रेलियाविरूद्ध आहे. तर 31 जुलैला भारतीय महिला संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आठ सदस्यांचा सहयोगी स्टाफ आणि तीन राखीव खेळाडूंची देखील निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.