मुंबई इंडियन्समध्ये अर्जुन तेंडुलकर विरुद्ध राजकारण सुरू?

गेल्या दोन दिवसांपासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर चांगलाच चर्चेत आला आहे.
Conspiracy of finish Arjun Tendulkar Carrier in MI Fans reaction
Conspiracy of finish Arjun Tendulkar Carrier in MI Fans reactionesakal
Updated on

गेल्या दोन दिवसांपासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर चांगलाच चर्चेत आला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबादसोबत खेळण्यापूर्वी अर्जुनचा सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता. त्यामुळे तो हैदराबादविरुद्ध मैदानात उतरणार अशी चर्चा रंगली होती.

पण तसे काहीच घडले नाही. यापूर्वीही गुजरातविरुद्ध खेळण्यापूर्वी अर्जुनचा फोटो शेअर केला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स सध्या ट्रोल होत आहे. अशातच आयपीएलमध्ये सचिन तेंडुलकरला शह देण्याचे राजकारण खेळले जात आहे. असा आरोप चाहत्यांवर्गातून होताना दिसत आहे.

Conspiracy of finish Arjun Tendulkar Carrier in MI Fans reaction
MI च्या अखेरचा सामन्यात खेळणार 'अर्जून', कॅप्टन रोहितने दिले संकेत

काल झालेल्या सामन्यात हैदराबादने सामन्यात मुंबईचा 3 धावांनी पराभव केला. प्लेऑफमधून बाहेर पडलेली मुंबई इंडियन्सने कालच्या सामन्यात नवीन खेळाडूंना संधी दिली होती. पण त्याचा अर्जून नव्हता. अर्जुन कधी पदार्पण करणार यांची सर्व चाहत्यांना प्रतीक्षा आहे. अशातच संघाचा कॅप्टन रोहित शर्माने अखेरच्या सामन्यात आणखी दोन नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अखेरच्या मॅच मध्ये तरी अर्जुन खेळताना दिसेल का अशी चर्चा सुरु आहे.

मात्र, मुंबई इंडियन्सला चाहता वर्ग करताना दिसत आहे. ''राजकारण !! अर्जून तेंडुलकरला आयपीएल मध्ये संधी न देण्यामागे सचिन तेंडुलकरला शह देण्याचे राजकारण खेळले जात आहे . आयपीएल मध्ये चांगला खेळ केला तर तर त्याचा भारतीय संघातील निवडीसाठी विचार केला जातो . अर्जून तेंडुलकरला दोन आयपीएल हंगामात बाहेर बसवून त्यांचे करिअर खराब करण्याचा डाव खेळला जात आहे . सचिन पूत्र अर्जूनला संधी न देता खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाच आव्हान देण्यात येत आहे. असे आहे डर्टी राजकारण !! असे गंभीर आरोप करत बापाच्या असूयेपोटी मुलांचा बळी देऊ नका . अशी विनंती केली आहे.

MI Fan
MI Fan
Conspiracy of finish Arjun Tendulkar Carrier in MI Fans reaction
सचिनच्या अर्जुनमुळं Mumbai Indians होतीय ट्रोल, काय आहे कारण?

मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना 21 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. त्यामध्ये आणखी दोन नविन खेळाडूंना संधी देणार असल्याचे मोठं वक्तव्य रोहितने केलं आहे. मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला ३० लाख रुपयांना खरेदी केले होते.

मुंबई इंडियन्सने गेल्या हंगामातही अर्जुनला २० लाख रुपयांना खरेदी केले होते, पण त्याला एकही सामना खेळावला नव्हता, आणि या हंगामातही तसेच घडले आहे. मुंबई इंडियन्सने मात्र अर्जुन तेंडुलकरचा फोटो सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.