Copa : गोलीची हिरोगिरी! मेस्सीची अर्जेंटिना फायनलमध्ये (VIDEO)

र्जेंटिनाचा गोलकिपर एमी मार्टिनेझ याने कोलंबियाचा डाव उधळून लावला.
Argentina vs Colombia
Argentina vs Colombia Twitter
Updated on

Copa America 2021 : कोपा अमेरिका स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायलचा निकाल पेनल्टी शूट आउटमध्ये लागला. मेस्सीच्या अर्जेंटिनाने पेनल्टी शूट आउटमध्ये 3-2 अशी बाजी मारत फायनल गाठली. अर्जेंटिनाचा गोलकिपर एमी मार्टिनेझ याने कोलंबियाचा डाव उधळून लावला. त्याच्या तीन सेव्हच्या जोरावर अर्जेंटिनाचा विजय पक्का झाला. जेतेपद मिरवण्यासाठी अर्जंटिनासमोर आता गतविजेत्या ब्राझीलचे आव्हान असणार आहे. (Copa America 2021 Argentina defeats Colombia 3-2 on penalties and qualifies for the final against Brazil Emi Martinez the shootout hero)

ब्राझीलच्या इस्टाडिओ नॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात अर्जेंटिनाने सातव्या मिनिटालाच आघाडी घेतली. लिओनेल मेस्सीच्या असिस्टवर लोटारो मार्टिनेझने सुरेख गोल नोंदवला. सुरुवातीच्या मिनिटांत मिळालेली आघाडी अर्जेंटिनाने पहिल्या हाफच्या खेळापर्यंत कायम ठेवली. दुसऱ्या हाफमध्ये कोलंबियाने 'हम किसी से कम नहीं' असा रुबाब दाखवत आक्रमण करण्यास सुरुवात केली. 61 व्या मिनिटाला लुईस डायझने याने केलेल्या गोलच्या जोरावर कोलंबियाने 1-1 अशी बरोबरी साधली. दोन्ही संघातील खेळाडूंना धडाधड येलो कार्ड मिळाल्यानंतर निर्धारित वेळेतील अखेरच्या टप्प्यात दोन्ही संघाकडून सावध पवित्रा घेण्यात आला. परिणामी सामना पेनल्टी शूट आउटमध्ये गेला.

पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेंटिना गोली ठरला हिरो

कोलंबियाच्या कुआड्राडोने पहिली किक यशस्वीपणे मारली. त्यानंतर अर्जेंटिनाकडून 150 वा सामना खेळणाऱ्या कर्णधार मेस्सीही गोलपोस्ट भेदण्यात यशस्वी ठरला. कोलंबियाला दुसऱ्या किकवर अलेक्सिस सान्चेझनं निराश केलं. अर्जेंटिनाचा गोलकिपर एमी मार्टिनेझनने त्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे कोलंबिया बॅकफूटव गेले. पण रॉड्रिगो डी पॉलची पेनल्टी मिस झाली आणि कोलंबियाच्या पुन्हा पल्लवित झाल्या.

दुसऱ्या बाजूला अर्जंटिनाचा गोलकिपर प्रतिस्पर्ध्याला संधी देण्याच्या अजिबात मूडमध्ये नव्हता. त्याने कोलंबियाच्या येरी मिनाची किक फेल ठरवली. अर्जेंटिनाकडून लॉटरो मार्टिनेझ, लियान्ड्रो परेडिस यांनी आपली जबाबदारी यशस्वी पार पाडली. कोलंबियाकडून मिगुएल बोरजानेही स्कोअर केला. पेनल्टी शूट आउटमध्ये 3-2 असा स्कोअर असताना अर्जेंटिनाच्या एमी मार्टिनेझन याने आणखी एक अप्रतिम सेव्ह करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.