Copa America 2024 : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची गटवारी जाहीर! गतविजेते अर्जेंटिना, चिली एकाच गटात

Copa America 2024 marathi news
Copa America 2024 marathi newssakal
Updated on

Copa America 2024 All groups full schedule : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली. गतविजेता अर्जेंटिनाचा संघ अ गटात असून या गटामध्ये चिली व पेरु या देशांचाही समावेश आहे. कॅनडा - त्रिनिदाद टोबॅगो यांच्यामधील विजेता संघ अ गटामध्ये चौथा संघ म्हणून निवडला जाणार आहे. अमेरिकेमध्ये पुढल्या वर्षी (२०२४) २० जून ते १४ जुलै या कालावधीत कोपा अमेरिका स्पर्धा रंगणार आहे.

Copa America 2024 marathi news
Schoolympics 2023 : सकाळ स्कूलिंपिक नेमबाजीत समर्थ, आर्या, अनिरुद्ध, सानिकाला सुवर्ण

अर्जेंटिनाचा संघ सलामीचा सामना २० जून रोजी खेळणार आहे. कॅनडा - त्रिनिदाद टोबॅगो यांच्यात प्ले ऑफची लढत रंगणार असून यांच्यातील विजेत्या संघाला अ गटात स्थान मिळणार आहे. याच संघाशी अर्जेंटिनाचा संघ पहिला सामना खेळेल. अर्जेंटिनाचा संघ साखळी फेरीतील पुढील सामना २५ जूनला चिलीशी, तर २९ जूनला पेरुशी खेळेल.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील बलाढ्य देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझील देशाचा ड गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात त्यांच्यासोबत कोलंबिया, पॅराग्वे या देशांचाही समावेश आहे. तसेच कोस्टारिका - होडुंरस यांच्यामध्ये प्ले ऑफ लढत होणार असून यांच्यामधील विजेता संघ ड गटात समाविष्ट होईल.

Copa America 2024 marathi news
Rishabh Pant : ऋषभ पंत 'या' नवीन नियमाने IPL 2024 मध्ये खेळणार; कर्णधारपदावर सस्पेन्स

गटवारीवर नजर (१६ संघांचा सहभाग)

  • अ - अर्जेंटिना, पेरु, चिली, (चौथा संघ : कॅनडा किंवा त्रिनिदाद टोबॅगो)

  • ब - मेक्सिको, इक्वेडोर, वेनेझुएला, जमैका

  • क - अमेरिका, उरुग्वे, पनामा, बोलिविया

  • ड - ब्राझील, कोलंबिया, पॅराग्वे, (चौथा संघ : कोस्टारिका किंवा होडुंरस)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()