Copa Final : मेस्सी vs नेमार

पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्धच्या विजयाची झळाळीही तेवढीच मोलाची असेल.
Argentina vs Brazil
Argentina vs BrazilCopa America Twitter
Updated on

रिओ द जानेरिओ : लिओनेल मेस्सी आणि नेमार या बार्सिलोना संघातील आजी-माजी खेळाडूतील लढत म्हणजे कोपा अमेरिका स्पर्धेतील अंतिम लढत असे सांगून हे संपणार नाही. ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यात भारतीय वेळेनुसार पहाटे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद उंचावणाऱ्या संघासाठी त्यास पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्धच्या विजयाची झळाळीही तेवढीच मोलाची असेल. (Copa America Final 2021 Argentina vs Brazil Like Lionel Messi vs Neymar Mega Final)

काही वर्षांपूर्वी पेले सरस की मॅराडोना हा वाद फुटबॉल जगतात रंगत असे, त्यावेळी ब्राझील तसेच अर्जेंटिनाचे चाहते एकमेकांविरुद्धच्या संघर्षाची फोडणीही देत असत. अर्थात मॅराडोना असो किंवा पेले दोघांनाही कोपा अमेरिका करंडक उंचावता आलेला नाही. मात्र यावेळी नेमार किंवा मेस्सी या विजेतेपदाचा दुष्काळ नक्कीच संपवणार. मेस्सीसाठी ही अखेरची संधी मानली जात आहे.

Argentina vs Brazil
Wimbledon : नंबर वन अ‍ॅश्ली बार्ती नवी सम्राज्ञी!

सहा वेळा जगातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या मेस्सीने महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय जेतेपद जिंकलेले नाही. आता कारकीर्द अंतिम टप्‍प्‍यात यंदा कोपा आणि पुढील वर्षी विश्वकरंडक जिंकण्याचा त्याचा इरादा असेल. त्याला 2007, 2015 आणि 2016 च्या कोपा, तर 2014 च्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत हार स्वीकारावी लागली आहे.

अर्जेंटिनास विजेते करणे हेच मेस्सीसाठी आता एकमेव लक्ष्य आहे. आम्ही मेस्सीला विजेतेपदापासून नक्कीच रोखणार, असे ब्राझीलचा सेंटर बॅक मार्क्विन्होस याने सांगितले. मेस्सीला जसे विजेतेपद हवे आहे, तसेच आमच्या नेमारला हवे आहे. अर्थात ही त्याची काही अखेरची कोपा नाही, असेही मार्क्विन्होसने सुनावले. दोन वर्षांपूर्वी ब्राझीलने घरच्या मैदानावर कोपा विजेतेपद उंचावले, त्यावेळी नेमार संघात नव्हता. पारंपरिक प्रतिस्पर्धी ब्राझीलविरुद्ध आमची अंतिम लढत आहे. दक्षिण अमेरिकेतीलच नव्हे तर फुटबॉल जगतातील सर्वोत्तम दोन संघांतील अंतिम लढत नक्कीच चुरशीची होणार, असे अर्जेंटिनाचे मार्गदर्शक लिओनेल शालोनी यांनी सांगितले. ब्राझील आणि अर्जेंटिना संघातील लढत फुटबॉलपेक्षा मोठी आहे. प्रतिस्पर्धी संघांची जर्सी प्रत्येक फुटबॉल शौकिनास आकर्षित करते, असे मार्क्विन्होस म्हणाला.

Argentina vs Brazil
जबऱ्या कॅचनंतर प्रियांका गांधीही झाल्या हरलीनच्या फॅन

अर्जेंटिना

जमेच्या बाजू : रिंगमास्टर मेस्सी गोलच्या संधीही सातत्याने निर्माण करीत आहे. प्रतिकूल परिस्थितही शांत असणारे मार्टिनेझचे गोलरक्षण तसेच ताकदवान राखीव खेळाडू.

कमकुवत बाजू : मधल्या फळीत हुशारीने चालीने करण्याचा अभाव. मेस्सीवर जास्तच अवलंबून असणे. नेमारसारखा कोणतीही दयामाया न दाखवणारा खेळाडू अर्जेंटिनाचा बचाव नक्कीच भेदू शकतो.

संधी : प्रमुख स्पर्धेतील विजेतेपदाचा 28 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी. लढत होणाऱ्या मॅराकाना स्टेडियमवर 2014 मध्ये अर्जेंटिना विश्वकरंडकाची अंतिम लढत हरले होते. त्याच्या भरपाईची संधी

धोका : गेल्या काही वर्षांत सातत्याने महत्त्वाच्या लढती जिंकण्यात आलेले अपयश संघावरील दडपण वाढवणार आहे. स्टेडियम रिकामे असले तरी ब्राझीलचा घरच्या मैदानात सामना करणे सोपे नाही.

ब्राझील

जमेच्या बाजू : नेमारचा समावेश असलेले आक्रमण. त्यातच ल्युकास पॅक्वेताचा वाढता प्रभाव. भक्कम मधल्या फळीमुळे आक्रमण जास्त मुक्तपणे. बचावही भक्कम तसेच सक्षम राखीव खेळाडू

कमकुवत बाजू : महत्त्वाच्या अंतिम लढतीत खेळण्याचा अनेक खेळाडूंना अनुभव नाही. प्रसंगी नेमारवर जास्तच मदार

संधी : घरच्या मैदानावर खेळताना चाहत्यांचे थेट दडपण नसेल, तसेच घरच्या मैदानावर विजेतेपद उंचावण्याची संधी

धोका : अचानक आक्रमणाचा हरवणारा जोश, जिससच्या अनुपस्थितीचा चालीतील भेदकतेवर होणारा परिणाम, त्याचबरोबर मेस्सीला फ्री किक मिळवण्यापासून रोखण्याचे दडपणही

कोपा अमेरिका म्हणजे ब्राझील-अर्जेंटिनाच नव्हे

सर्वाधिक कोपा अमेरिका विजेतेपदे उरुग्वेची (15), त्यानंतर अर्जेंटिना (14) आणि ब्राझील (9).

ही 47 वी स्पर्धा. त्यात केवळ चार वेळाच ब्राझील आणि अर्जेंटिनात अंतिम लढत

टिटे वि. शालोनी

टिटे ब्राझीलचे पाच वर्षांपासून मार्गदर्शक, तर लिओनेल शालोनी यांच्याकडे तीन वर्षांपासून अर्जेटिनाची सूत्रे

टिटे यांच्या कालावधीत ब्राझीलचे ६० सामन्यांत ४५ विजय, तर पाच पराभव, तर शालोनी यांनी सूत्रे घेतल्यापासून अर्जेंटिनाचे ३३ पैकी १९ सामन्यात विजय व ४ पराभव

शालोनी यांचा अखेरचा पराभव टिटे यांच्याकडे ब्राझीलची सूत्रे असताना. २०१९ च्या स्पर्धेत ब्राझीलचा अर्जेंटिनाविरुद्ध २-० विजय

ब्राझील गेल्या तेरा सामन्यात अपराजित, त्यापूर्वीची हार अर्जेंटिनाविरुद्ध

कोपा अमेरिका

आमने सामने

तपशील ब्राझील अर्जेंटिना

एकूण लढती 111 111

विजय 46 40

अनिर्णीत 25 25

गोल 171 163

कोपा लढती 33 33

विजय 10 15

गोल 40 15

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()