Argentina Beat Colombia In Copa America 2024 : कोपा अमेरिका फायनलमध्ये कोलंबिया आणि अर्जेंटिना यांच्यात चुरशीची लढत पाहिला मिळाली. फायनलमध्ये अर्जेंटिनाने कोलंबियाचा 1-0 असा पराभव केला. यासह अर्जेंटिनाने सोळाव्यांदा कोपा अमेरिकाचे विजेतेपद पटकावले आहे.
यादरम्यान अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओन मेस्सीला दुखापत झाली, त्यामुळे त्याला मध्येच मैदान सोडावे लागले. 90 मिनिटांच्या पूर्ण वेळेत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत पोहोचला. 112व्या मिनिटाला लॉटारो मार्टिनेझने अर्जेंटिनासाठी गोल केला. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली आणि मेस्सीचा संघ 1-0 असा विजय मिळवत चॅम्पियन ठरला. 2021 मध्ये, संघाने विजेतेपदाच्या सामन्यात ब्राझीलचा पराभव केला.
लिओनेल मेस्सी संपूर्ण कोपा अमेरिका फायनल खेळू शकला नाही. सामन्याच्या उत्तरार्धात मेस्सीच्या पायाला दुखापत झाली. घोट्याच्या दुखापतीमुळे मेस्सीला 66व्या मिनिटाला मैदान सोडावे लागले. तोही बाकावर बसला होता. मात्र, संघाला त्याची उणीव भासली नाही. जोवानी लो सेल्सोच्या सहाय्यावर मार्टिनेझने गोल केला.
अर्जेंटिनानेही सलग तीन ट्रॉफी जिंकल्या आहेत. दोन कोपा अमेरिका विजेतेपदांसोबतच मेस्सीच्या संघाकडे फिफा वर्ल्ड कपही आहे.
मेस्सीची चौथी आंतरराष्ट्रीय ट्रॉफी
लिओनेल मेस्सीच्या कारकिर्दीतील ही चौथी आंतरराष्ट्रीय ट्रॉफी आहे. 2021 मध्ये त्याने कोपा अमेरिकाच्या रूपाने पहिली ट्रॉफी जिंकली होती. अर्जेंटिनाने 2022 मध्ये युरो आणि कोपा अमेरिका विजेते यांच्यात होणारा आर्टेमियो फ्रँची कपही जिंकला होता. त्याच वर्षी मेस्सीने पहिला फिफा वर्ल्ड कप जिंकला. आता मेस्सीच्या ताफ्यात आणखी एक आंतरराष्ट्रीय ट्रॉफी आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.