कोरोना संक्रमित मिल्खा सिंगना फोर्टीस हॉस्पिटलमध्ये केलं ऍडमिट

कोरोना संक्रमित मिल्खा सिंगना फोर्टीस हॉस्पिटलमध्ये केलं ऍडमिट
Updated on

चंदीगढ : भारताचा महान धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. 'फ्लाइंग शीख' म्हणून जगभरात ओळखले जाणारे मिल्खा सिंग (Milkha Singh) चंदीगढ येथील आपल्या घरातच विलगीकरणात होते. 91 वर्षीय मिल्खा सिंग यांना कोरोनाची कोणताही लक्षणं नव्हती. मात्र, आता त्यांना मोहालीमधील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आहे.

हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, मिल्खा सिंग यांची तब्येत स्थिर आहे, तसेच त्यांना पूर्व खबरदारी म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आहे. मिल्खा सिंह हे गेल्या गुरुवारी कोरोना संक्रमित आढळले होते. मिल्खा सिंग यांना बुधवारी रात्री ताप होता. त्यांची पत्नी निर्मल कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना अजून लस देण्यात आली नव्हती. (Covid positive Milkha Singh admitted to Fortis Hospital in Mohali)

मिल्खा सिंग पॉझिटीव्ह आढळल्यावर म्हणाले होते की, 'आमचे काही मदतनीस पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे घरातील सर्वांची कोरोना चाचणी केली. फक्त माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची कोणतीही लक्षण नाहीत. मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तीन ते चार दिवसांत पूर्णपणे ठीक होईल असं डॉक्टरांनी सांगितलं.'

आशियाई खेळात पाच वेळा मिल्खा सिंग (Milkha Singh) यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहेत. 1960 मध्ये रोम येथे झालेल्या 40 मीटर शर्यतीत मिल्खा सिंग चौथ्या क्रमांकावर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.