भारताच्या पाच अ‍ॅथलीटना कोरोनाची बाधा

टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवलेल्या प्रियांका गोस्वामीचाही समावेश
priyanka goswami
priyanka goswamiFile Photo
Updated on

बंगळूर- टोकियो ऑलिंपिकची पात्रता मिळवलेल्या प्रियांका गोस्वामीसह भारताच्या पाच अ‍ॅथलीटसना कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्वांचा मुक्काम तसेच सराव बंगळूरच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात सरू आहे. प्रियांकाने नुकतीच २० किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत ऑलिंपिक पात्रता नोंदवली आहे. तिच्यासह आशियाई क्रीडा स्पर्धेत १५०० मीटर शर्यतीतील विजेता जिन्सन जॉन्सन, लांब उडीतील स्पर्धक पारुल चौधरी, स्टीपलचेसर चिंता यादव, चालण्याच्या स्पर्धेतील एकनाथ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह चालण्याच्या स्पर्धेसाठीचे मार्गदर्शक अलेक्झांडर आर्तसिबॅशेव हेही बाधित आहेत.

priyanka goswami
IPL 2021 : संजूच्या विक्रमी शतकाला पराभवाचं ग्रहण! पंजाबचा भांगडा

जॉन्सनचा रूम पार्टनर असलेला चालण्याच्या शर्यतीतील के. टी. इरफान याची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सोमवारी झालेल्या चाचणीत मी पॉझिटिव्ह ठरलो होतो. सध्या मी विलगीकरणात आहे. माझी तीन दिवसांत पुन्हा चाचणी होईल. त्यात निगेटिव्ह येईन, याची खात्री आहे. के. टी. इरफान माझ्या जास्त संपर्कात होता. त्याची चाचणी निगेटिव्ह आली आहे, असे जॉन्सनने सांगितले. गोस्वामी, चिंता यादव यांच्यासह अन्य अ‍ॅथलीटचे क्रीडा प्राधिकरण केंद्रातच विलगीकरण करण्यात आले आहे. गोस्वामीने फेब्रुवारीत झालेल्या राष्ट्रीय चालण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम करीत ऑलिंपिक पात्रता मिळवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.