Sunil Narine First Cricketer Red Card : फुटबॉल किंवा हॉकी या खेळात रेड कार्डचे वेल्यू खूप जास्त आहे. मैदानावरील खेळाडूंच्या वाईट वर्तनासाठी लाल कार्ड दिल्या जातो. पण क्रिकेटच्या खेळात असं कधीच दिसलं नाही. पण कॅरेबियन प्रीमियर 2023 मध्ये प्रथमच रेड कार्ड दाखवण्यात आले. येथेच क्रिकेट इतिहासातील पहिले लाल कार्ड एखाद्या खेळाडूला दाखवण्यात आले.
सुनील नरेन हा रेड कार्ड दाखवला गेलेला जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. रविवारी म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी त्रिनबागो नाईट रायडर्स आणि सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रिओट्स यांच्यात सामना झाला.
वेस्ट इंडिजचा महान खेळाडू किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील त्रिनबागो नाइट रायडर्स (TKR) ला तिसरा ओव्हर-रेट पेनल्टी मिळाला. मैदानावरील पंचांनी लाल कार्ड दाखवण्यात एक क्षणही वाया घालवला नाही. नरेन ज्याने आधीच चार षटकांचा स्पेल पूर्ण केला होता, तो मैदानाबाहेर गेला आणि टीकेआरला 30-यार्ड वर्तुळाबाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षक उभे करण्यास भाग पाडले गेले.
त्रिनबागो नाईट रायडर्ससाठी अंतिम षटक महागात पडले. हे षटक टाकण्यासाठी आलेल्या ड्वेन ब्राव्होने एकूण 18 धावा दिल्या. TKR साठी नरेनने चेंडू हातात घेऊन चमकदार कामगिरी केली. त्याने 24 धावांत एकूण 3 बळी घेतले. नरेनने यष्टिरक्षक-फलंदाज जोशुआ दा सिल्वा, जेड गूली आणि कॉर्बिन बॉश यांना बाद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.