इंग्लंडमध्ये ODI साठी 80 टक्के प्रेक्षकांना एन्ट्री; पण...

या सामन्यासाठी स्टेडियमच्या प्रेक्षक क्षमतेच्या 80 लोकांना प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आलीये.
England Cricket Ground
England Cricket GroundTwitter
Updated on

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील एजबेस्टनमध्ये रंगणाऱ्या वनडे सामन्यासाठी 80 टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनाच्या संकट अनेक सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला मोजक्या संख्येने प्रेक्षक सामन्यासाठी उपस्थितीत असतात. प्रेक्षक उपस्थितीची मर्यादा आता आणखी वाढणार आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेती तिसरा आणि अखेरचा सामना हा 13 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी स्टेडियमच्या प्रेक्षक क्षमतेच्या 80 लोकांना प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आलीये. (Cricket 80 Percentage Capacity Crowd To Be Allowed At Edgbaston For England vs Pakistan ODI)

England Cricket Ground
'ते अगदी खास आहे': विल्यमसनने कोहलीच्या संबंधांचा केला उलगडा

क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांना मिळालेली परवानगी ही एक चांगली बातमी आहे, असे मत वारविकशायरचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट केन यांनी व्यक्त केले आहे. प्रेक्षकांना परवानगी मिळाली असली तरी काही नियम लागू राहणार आहेत. 14 दिवसांपूर्वी ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा लोकांनाच स्टेडियममध्ये एन्ट्री देण्यात येईल. डोस घेतले नसतील अशा चाहत्यांची निराशा होणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात आली असून कोरोना निगिटिव्ह रिपोर्ट दाखवून चाहते मॅचचा स्टेडियममध्ये जाऊन आनंद घेऊ शकतात, असेही ते म्हणाले.

England Cricket Ground
सचिन तेंडुलकरने आजच केला होता 'तो' धमाकेदार विश्वविक्रम

यापूर्वी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात एजबेस्टनच्या मैदानात 70 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला होता. या सामन्याला 60 हजार लोकांनी उपस्थिती लावली होती. इंग्लंडमध्ये सध्या क्रिकेटची सुकाळ सुरुये. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेनंतर इंग्लंडमध्येच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट फायनलचा सामना रंगला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ते पाकिस्तान विरुद्धही मालिका खेळणार आहेत.

भारतीय पुरुष संघाशिवाय भारतीय महिला संघही सध्या इंग्लंडच्या मोठ्या दौऱ्यावर आहे. एकमेव कसोटी सामना अनिर्णित राखल्यानंतर पहिल्या वनडेत भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. उर्वरित दोन वनडे सामन्यांसह भारतीय महिला इंग्लंड महिला संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. युरोपात रंगलेल्या फुटबॉल स्पर्धेतील शेवटच्या टप्प्यात मोठ्या संख्येने प्रेक्षक फुटबॉलचा आनंद घेताना स्टेडियममध्ये दिसत असताना आता क्रिकेटच्या स्टेडियममध्येही भरलेले दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.