भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विद्यामान समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आकाश चोप्रानं आता आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार एम.एस. धोनी (MS Dhoni) आणि चेन्नईबद्दल वक्तव्य केलं आहे. धोनीचं स्वत:ला सीएसकेपासून वेगळं करेल, असा दावा आकाश चोप्रानं आपल्या युट्युब व्हिडिओमध्ये केला आहे. आयपीएल 14 चा उर्वरित हंगाम स्पटेबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात दोन संघ वाढणार आहेत. त्यामुळे मोठा लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये अनेक संघ आपल्या स्टर (Star) खेळाडूंना रिटेन (Retain) करुन इतर खेळाडूंना रिलीज (Release) करु शकतात. चेन्नई सुपर किंगमध्ये पहिल्या हंगामापासून कर्णधार असलेला एमएसधोनीला चेन्नईचा संघ रिटेन करेल यात शंका नाही. पण धोनी स्वतःच संघाबाहेर जाऊ शकतो, असं आकाश चोप्रा (MS Dhoni) म्हणालाय. (cricket aakash chopra big statement on ms dhoni chennai super kings retain ipl)
आपल्या युट्युबवरील व्हिडिओत आकाश चोप्रा म्हणाला, 15 व्या हंगामासाठी एमएस धोनीला चेन्नईचा संघ नक्कीच रिटेन करेल. धोनीही चेन्नई संघाला विचारु शकतो, तुम्ही मला रिटेन करणार आहात का आणि का? तसेच पुढील तीन वर्ष मी आयपीएल खेळेल की नाही? यावर प्रश्नचिन्ह आहे. असं असतानाही तुम्ही मला का रिटेन करत आहात? असं धोनी विचारु शकतो. चेन्नईचा संघ रविंद्र जडेजा आणि एमएस धोनीला रिटेन करेल. याबरोबरच त्यांना संधी मिळाल्यास ते आरटीएम कार्डचा वापर करुन दीपक चाहरला संघात स्थान घेऊ शकतात, असेही आकाश चोप्रा म्हणाला.
तुम्ही कोणत्याही खेळडूला रिटेन करु शकत नाही. असा जर नियम आला तर चेन्नई सुपर किंग या नियमाशी सहमत असेल. या संघात पुन्हा नवीन खेळाडू भरती होऊ शकतात. मग कोणत्याही खेळाडूला 15 ते 17 कोटी देऊन थांबविण्याची आवश्यकता भासणार नाही. दरम्यान, आयपीएल 2020 चा हंगाम सोडल्यास चेन्नईने प्रत्येक वेळी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 211 सामने खेळले असून, 40.2 च्या सरासरीने त्याने 4669 धावा केल्या आहेत. या त्याने 23 अर्धशतके झळकावली असून, नाबाद 84 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.