India vs New Zealand 2nd Test At Wankhede Stadium, Mumbai : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगला आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. दुसऱ्या दिवशीच्या खेळात पुन्हा एकदा एजाज पटेलचा जलवा पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवशीच्या खेळात वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) आणि अश्विनची (Ravichandran Ashwin) विकेट घेत पटेलनं पाचपेक्षा अधिक विकेट नावे करण्याची किमया साधली. पहिल्या दिवशीच्या खेळात भारतीय संघाने चार विकेट गमावल्या होत्या. शुभमन गिल (Shubman Gill), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), विराट कोहली (Virat Kohli) आणि श्रेयस अय्यर(Shreyas Iyer) या चौघांची विकेटही एजाज पटेलनेच (AjazPatel) घेतली होती. वानखेडेच्या मैदानातील त्याच्या या कामगिरीनं अनेकांना अनिल कुंबळेंची पाकिस्तान विरुद्ध केलेली कामगिरी आठवण झाली असेल. Shubman Gill Cheteshwar Pujara Virat Kohli (c) Shreyas Iyer Wriddhiman Saha (wk) Ravichandran Ashwin
अनिल कुंबळे यांनी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात एका डावात 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. कसोटी क्रिकेटच्या 141 वर्षांच्या इतिहासात एका डावात 10 विकेट घेण्याचा पराक्रम केवळ दोन गोलंदाजांनी करुन दाखवला आहे. इंग्लंडच्या जीम लेक (Jim Laker) यांनी 1956 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध मँचेस्टर कसोटी सामन्यात एका डावात 10 विकेट घेतल्या होत्या. अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी 1999 मध्ये जीमी यांची बरोबरी केली होती. पाकिस्तान विरुद्ध दिल्लीच्या मैदानात कुंबळेंनी एका डावात 10 विकेट घेतल्या होत्या.
न्यूझीलंडच्या ताफ्यातील भारतीय वंशाजाच्या एजाज पटेलने मुंबईच्या मैदानात सुरु असलेल्या (Mumbai Test) दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 6 गडी बाद केले आहेत. एजाज पटेल याला एका डावात (Ajaz Patel) 10 विकेट मिळवून अनिल कुंबळेंसह जीमी या दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. यासाठी त्याला 4 विकेट मिळवायच्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.