बॉल टेम्परिंग प्रकरण; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये पुन्हा वादळ

cameron bancroft and steve smith
cameron bancroft and steve smithfile photo
Updated on

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाच्या नैतिकतेवर काळीमा फासणारे बॉल टेम्परिंग प्रकरण (Ball Tampering Case ) पुन्हा एकदा चर्चेत आलेय. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) च्या इंटेग्रिटी युनिटने या प्रकरणात 9 महिन्यांची शिक्षा भोगलेल्या कॅमरुन बेनक्रॉफ्टशी संपर्क केल्याचे वृत्त आहे. 2018 मध्ये क्रिकेट विश्वात खळबळ माजवून देणाऱ्या बॉल टेम्परिंग प्रकरणातील नवी माहिती समोर येण्याची चर्चा रंगली आहे. बॉल टेम्परिंग प्रकरणात काही गोलंदाजही सामील असल्याची शक्यता बेनक्रॉफ्टने एका मुलाखतीमध्ये बोलून दाखवली होती. या प्रकरणात तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उप कर्णधार यांच्यावर एका वर्षांची बंदी घालण्यात आली होती. केपटाउनच्या मैदानात चेंडू छेडछाड प्रकरणात बेनक्रॉफ्टला नऊ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते.

cameron bancroft and steve smith
स्लेजिंगचा किस्सा; उथप्पाने घेतला होता हेडनशी पंगा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख बेन ओलिव्हर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेबेका मरे यांच्या नेतृत्वाखालील इंटेग्रिटी युनिटने जुन्या प्रकरणाच्या चौकशीसाठी बेनक्रॉफ्टशी संपर्क केला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करुन कारवाई करण्यात आली होती, असेही ते म्हणाले. जर त्याच्याकडे याप्रकरणातील नवीन काही माहिती समोर आली तर यावर विचार करावा लागेल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

cameron bancroft and steve smith
धोनीनं केली जडेजाची कॉपी, व्हिडिओ घालतोय धुमाकूळ

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही (Australian Bowlers) बॉल टेम्परिंगची (ball tampering) कल्पना होती, असे मोठे वक्तव्य बेनक्रॉफ्टने केले होते. 'द गार्जियन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याला याप्रकरणात गोलंदाजाचा हात होता का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी स्वत:ची चूक कबूल करताना त्याने कदाचित याची गोलंदाजांनाही कल्पना होती, असे उत्तर त्याने दिले. यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पुन्हा वादळ उठले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.