Ranji Trophy ठरल्याप्रमाणे; कोरोनाच्या धास्तीत गांगुलींचा सकारात्मक स्ट्रोक

Sourav Ganguly Corona Positive
Sourav Ganguly Corona Positiveesakal
Updated on

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी देशांतर्गत रणजी ट्रॉफी स्पर्धा (Ranji Trophy) ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे म्हटले आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना (Covid-19) रणजी ट्रॉफी स्पर्धा संकटात सापडणार अशी चर्चा रंगली होती. या चर्चेला गांगुलींनी पूर्णविराम दिलाय. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा खेळावर संकटाचे ढग दाटून आले आहे. विशेष करुन युरोपात सुरु असलेल्या अनेक स्पर्धेत स्टाफ सदस्य आणि खेळाडू कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याच्या बातम्या येत आहेत.

देशातीलही परिस्थिती काही वेगळी नाही. दिवसागणिक कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. या परिस्थितीत देशांतर्गत क्रिकेटला पुन्हा फटका बसणार असे वाटत होते. पण गांगुलींनी रणजी स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार हे स्पष्ट केले आहे.

Sourav Ganguly Corona Positive
RSA vs IND : पहिल्या दिवसाअखेर आफ्रिका 167 धावांनी पिछाडीवर

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सौरव गांगुली म्हणाले की, रणजी ट्रॉफी स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होईल.13 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान या स्पर्धेतील सामने खेळवणे नियोजित आहे. कोलकाता तटस्थ ग्रुप स्टेज मॅचसह नॉकआउट सामन्यांची मेजवाणी करणार आहे. गांगुली यांच्या वक्तव्यापूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनने (CAB) काही खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. परिणामी स्थानिक स्पर्धा स्थगित कराव्या लागत आहेत, असे निवदेन त्यांनी जारी केले होते.

Sourav Ganguly Corona Positive
विराटची दुखापत पडणार पथ्यावर! घरच्या मैदानावर @100 ची संधी

दरम्यान मुंबई संघाचा सदस्य असलेला अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्याशिवाय टीमचे व्हिडिओ विश्लेषक यांनाही कोरोनाची लांगण झाली आहे. दुबेच्या जागी मुंबईने साईराज पाटील याची 20 सदस्यीय रणजी संघात निवड केलीये. बंगाल रणजी टीममध्ये सात जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे बंगालच्या संघाला मोठा दणका बसला आहे. एका बाजूला खेळाडू आणि स्टाफ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असताना गांगुलींनी वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही असे म्हटले आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण होत असताना बीसीसीआय याबाबतीत खेळाडूंच्या बाजूनं सकारात्मक विचार करताना दिसते. सध्याच्या घडीला कोरोनामुळे स्पर्धा स्थगित करण्याच्या मूडमध्ये ते अजिबात दिसत नाहीत, हेच गांगुलींच्या वक्तव्यातून स्पष्ट होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()