क्रिकेट_डायरी: Sachin Tendulkar विक्रमी शतक अन् निराशा!

या सामन्यात महेंद्रसिंह धोनीसोबत तेंडुलकरने सातव्या विकेटसाठी 172 धावांची भागीदारी केली होती.
Sachin Tendulkar
Sachin Tendulkar Esakal
Updated on

क्रिकेटच्या मैदानात शतकांचं शतक करणाऱ्या विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) चाहत्यांसाठी आजचा दिवस खास असाच आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ज्या सेंच्युरियनच्या मैदानातून कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे, त्याच मैदानात सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) विक्रमी शतक झळकावले होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध सचिन तेंडुलकरने 111 धावांची नाबाद खेळी केली होती. सचिन तेंडुलकरचे कसोटीतील हे 50 वे शतक ठरले होते. कसोटी क्रिकेटमध्ये हा पल्ला गाठणारा सचिन एकमेव खेळाडू आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत कसोटी आणि वनडेत मिळून शंभर शतके झळकावली आहेत. यात सर्वाधिक 51 कसोटी शतके ही कसोटीत तर 49 शतके वनडेतील आहेत. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. पहिल्या डावात टीम इंडिया 136 डावात आटोपली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून जॅक कॅलिसनं केलेलं द्विशतक (201), हाशीम आमलाची 140 धावांची खेळी आणि एबी डिव्हिलियर्सने केलेल्या 129 धावांच्या खेळीमुळे यजमान आफ्रिकेनं पहिल्या डावात 4 बाद 620 धावांचा डोंगर रचला होता.

Sachin Tendulkar
Video : बटलरचा विकेटमागे जबरदस्त शो; कॅच एकदा बघाच

दुसऱ्या डावात सचिन तेंडुलकरने नाबाद शतक झळकावले. त्याने 241 चेंडूचा सामना करत 111 धावांची खेळी केली. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीसोबत तेंडुलकरने सातव्या विकेटसाठी 172 धावांची भागीदारी केली होती. धोनी 90 धावांवर परतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी तळाच्या फलंदाजांना अवघ्या 10 धावांत गुंडाळले. दुसऱ्या बाजूला तेंडुलकर नाबाद राहिला. भारतीय संघाने हा सामना एक डाव आणि 25 धावांनी गमावला होता.

Sachin Tendulkar
Ashes 2021 अँडरसनचा 'नाबाद शतकी रेकॉर्ड'; कुणीही नाही आसपास

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील डरबनमधील दुसरा सामना भारतीय संघाने 87 धावांनी जिंकला होता. तर केपटाउनमधील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या मालिकेची सुरुवात ही 26 डिसेंबरला सेंच्युरियनच्या मैदानातून होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नवा विक्रम प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरतोय का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.