Commonwealth Games 2026 : स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन होणार आहे. १२ वर्षांनंतर पुन्हा राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनाचा मान ग्लासगोला मिळाला आहे, परंतु या स्पर्धेतून काही महत्त्वाचे खेळ वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २३ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे आणि बजेट फ्रेंडली स्पर्धा घेण्यासाठी फक्त १० खेळांचाच समावेश करण्यात आलेला आहे. २०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धेतून हॉकी, बॅडमिंटन, नेमबाजी आणि कुस्ती आदी खेळ वगळण्यात आले आहेत, ज्यामध्ये भारताने २८० हून अधिक पदकं जिंकली आहेत. हा भारतासाठी खूप मोठा धक्का समजला जात आहे.