Cricket News : स्पोर्टरडार इंटेग्रिटी सर्विसेसच्या अहवालानुसार, २०२२ मधले १३ क्रिकेटचे सामने आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. स्पोर्टडार इंटिग्रिटी सर्व्हिसेस युनिट ही काही तज्ञांची आंतरराष्ट्रीय टीम आहे जी अनियमित सट्टेबाजी, मॅच-फिक्सिंग आणि खेळांमधील भ्रष्टाचाराच्या इतर प्रकारांचे विश्लेषण करते.
‘बेटिंग, करप्शन अँड मॅच-फिक्सिंग’ या २८ पानांच्या अहवालात असं म्हटलं आहे की २०२२ मध्ये, ९२ देशांमधील १२ क्रीडा शाखांमध्ये अभूतपूर्व १२१२ संशयास्पद सामने आढळून आले आहेत.
सामन्यांदरम्यान संशयास्पद गोष्टी शोधण्यासाठी कंपनी युनिव्हर्सल फ्रॉड डिटेक्शन सिस्टम (UFDS) या ऍप्लिकेशनचा वापर करते.
फुटबॉलमध्ये ७७५ सामने होते, जे कदाचित भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडले आहेत. बास्केटबॉल या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे आणि लॉन टेनिस तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे १२ खेळांपैकी क्रिकेटमध्ये केवळ १३ सामन्यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे आणि ते यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. हा आकडा आणखी जास्त असू शकतो, असंही या अहवालात म्हटलं आहे.
“अनेक खेळांमध्ये तुलनेने कमी संख्येने संशयास्पद सामने दाखवले जात असले तरी, १३ संशयास्पद क्रिकेट सामने हा स्पोर्टडार इंटिग्रिटी सर्व्हिसेसने नोंदवलेला सर्वोच्च वार्षिक आकडा आहे आणि हँडबॉल आणि फुटसल यांनीही त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक संशयास्पद सामन्यांची नोंद केली आहे,” असं अहवालात म्हटलं आहे. .
कोणत्या क्रीडाप्रकारात सर्वाधिक भ्रष्टाचार झाले आहे आणि ते आंतरराष्ट्रीय सामने आहेत की T20 लीगमधील सामने हे समजून घेण्यासाठी PTI ने Sportradar ला एक प्रश्नावली पाठवली होती.
अहवालात चित्रित केलेल्या ग्राफिक्सनुसार कंपनी भारतात खेळल्या गेलेल्या कोणत्याही सामन्यांचा संदर्भ देत नाही, असंही या अहवालात म्हटलं आहे.
त्यामुळे, अहवालात नमूद केलेल्या १३ भ्रष्ट सामन्यांपैकी एकही सामना भारतात खेळला गेला नाही असा अंदाज लावला जाऊ शकतो.
Sportradar २०२० मध्ये IPL सामन्यांदरम्यान बेटिंगमधील अनियमितता शोधण्यासाठी BCCI च्या भ्रष्टाचार विरोधी युनिटसोबत काम करत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.