भज्जी म्हणतो; वशीलेबाजीवर मिळते टीम इंडियाची कॅप्टन्सी

Harbhajan Blames Dhoni
Harbhajan Blames Dhoni Sakal
Updated on

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर हरभजन सिंग (Harbhajan Singh) बीसीसीआय विरुद्ध जोरदार बोलंदाजी करताना दिसत आहे. बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर असल्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांमुळे संघातील जागा गमावली असा आरोप केल्यानंतर आता भज्जीने आणखी एक मोठे विधान केले आहे. बीसीसीआयमध्ये ओळख नसल्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकलो नाही, असे त्याने म्हटले आहे. सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीवरुन वातावरण तापले असताना हरभजनने त्यात रॉकेल ओतण्याचे काम केले आहे.

हरभजन सिंगने ((Harbhajan Singh)) आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली होती. जगभरातील टॉप टी-20 संघाचा समावेश असलेल्या स्पर्धेत हरभजनने आपल्या कॅप्टन्सीची छाप सोडली होती. पण त्याला कधीच भारतीय संघात नेतृत्वाची (Team India Captaincy) संधी मिळाली नाही. क्रिकेटनेक्स्ट डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीवेळी याच मुद्यावरुन त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. भारतीय संघाचे कधीच नेतृत्व का मिळाले नाही, असा विचार कधी केला आहेस का? असा प्रश्न हरभजन सिंगला विचारण्यात आला होता.

Harbhajan Blames Dhoni
माणुसकी! स्टार क्रिकेटर सराव करताना हेलिकॉप्टर उतरलं मैदानात अन्...

मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करताना संघाने केलेली ही कामगिरी दुर्लक्षित झाल्याचे सांगत भज्जीनं बीसीसीआयवर गंभीर आरोप केला. बीसीसीआयमध्ये माझी ओळख नव्हती. बीसीसीआयमध्ये ज्या व्यक्तीचा दबदबा आहे त्याच्याशी तुमचं जमतं नसेल तर तुम्हाला कॅप्टन्सीचा सन्मान मिळत नाही, अशा आशयाचे वक्तव्य हरभजन सिंगने केले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे बीसीसीआयच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Harbhajan Blames Dhoni
हरभजन-पत्रकाराचा टिवटिवाट; BCCI अधिकाऱ्याची निवडसमितीत लुडबूड?

तो पुढे म्हणाला, हा मुद्दा सोडून द्या. कॅप्टन्सी करण्याची पात्रता होती हे मला स्वत:ला माहित आहे. आम्ही मैदानात कॅप्टनला मार्गदर्शन करायचो. मी भारतीय संघाचा कर्णधार होतो किंवा नव्हतो याचा काही फारसा फरक पडत नाही. संघाचे नेतृत्व मिळाले नाही याचा पश्चाताप कधीच वाटत नाही कारण मी देशाचे प्रतिनिधीत्व केले याचा अभिमाना बाळगतो, असेही भज्जी यावेळी म्हणाला.

धोनीविषयी काहीच तक्रार नाही

हरभजन सिंगने निवृत्तीनंतर बीसीसीआय अधिकाऱ्यांसह धोनीवर निशाणा साधला होता. काही बीसीसीआय अधिकाऱ्यांमुळे मला संघात स्थान मिळाले नाही. कदाचित महेंद्रसिंह धोनीही त्यांच्या मताशी सहमत झाला असेल, असे भज्जी म्हणाला होता. यावर त्याने पुन्हा भाष्य केले. धोनीसोबत आजही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याच्यावर नाराजी नसल्याचे सांगत भज्जीने बीसीसीआयवर तोफ डागली.

2011 मध्ये वर्ल्ड कप विजेत्या संघातील अनेक खेळाडू 2015 च्या वर्ल्ड कपमध्येही खेळू शकले असते. पण त्यावेळीच्या बीसीसीआय निवड समितीच्या सदस्यांमुळे ते शक्य झाले नाही. जर विद्यमान संघातील खेळाडू उत्तम कामगिरी करत असतील तर संघात नवे खेळाडू भरुन नाहक बदल करणे अर्थहिन होते, असे म्हणत त्याने तत्कालीन बीसीसीआय निवड समितीवर नाराजी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()