दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ पुन्हा एकदा स्वत:ला जगातील सर्वोत्तम संघ बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ (South Africa Cricket Team) पुन्हा एकदा स्वत:ला जगातील सर्वोत्तम संघ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक बड्या आणि दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ नव्या आणि कमी अनुभवी खेळाडूंच्या जोरावर जुनी ताकद पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या संघानं काही दिवसांपूर्वी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत बलाढ्य भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) पराभव केला होता.
दक्षिण आफ्रिकेचं सामर्थ्य पुन्हा सिध्द करण्याची जबाबदारी प्रशिक्षक आणि माजी अनुभवी यष्टीरक्षक मार्क बाउचर (Mark Boucher) याच्यावर आहे, परंतु बाउचर स्वतः वांशिक अत्याचाराच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात आहे. त्याची नोकरी धोक्यात आली असून आता आफ्रिकन संघातील खेळाडू आपल्या प्रशिक्षकाच्या बाजूनं साक्ष देण्याची तयारी करत आहेत. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ आणि बोर्डावर वांशिक भेदभावाच्या आरोपांच्या चौकशीत प्रशिक्षक मार्क बाउचरसह इतर काही दिग्गजांची नावे समोर आली होती. सामाजिक न्याय आणि राष्ट्र निर्माण समितीच्या (SJN) सुनावणीत बाउचरवर त्याच्या माजी कृष्णवर्णीय जोडीदाराविरुद्ध वर्णद्वेषी घोषणा केल्याचा आरोप होता. बाउचर यानंही हे आरोप मान्य केलेत.
या प्रकरणी आता बाउचरविरोधात सुनावणी सुरूय. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं (CSA) नियुक्त केलेल्या प्रशिक्षकाला हटवण्याची मागणी केलीय. अशा स्थितीत आपली नोकरी वाचवण्यासाठी बाउचर सध्याच्या संघातील खेळाडूंची मदत घेणार आहे. क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, 16 मेपासून सुरू होणाऱ्या अनुशासनात्मक सुनावणीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे अनेक खेळाडू प्रशिक्षक बाउचरच्या वतीने साक्ष देतील. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डानं एसजेएनच्या अहवालानंतर, बाउचरविरुद्ध 7 पानांचं आरोपपत्र जारी केलं होतं. त्यात माजी दिग्गज यष्टीरक्षकावर वांशिक अत्याचाराचा आरोप आहे. या प्रकरणी बाउचरविरोधात शिस्तभंगाची सुनावणी होणार आहे. तसेच, CSA बाउचर याला पदावरून बडतर्फ करण्याची मागणी करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.