Virat Kohli And Sourav Ganguly Different Statement : वनडे संघाचे नेतृत्व गमावल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) थेट बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या विरुद्ध पंगा घेतला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विराट कोहलीच्या निर्णयामुळेच रोहित शर्माकडे वनडे संघाची धूरा देण्यात आल्याचे गांगुलींनी म्हटले होते. बीसीसीआय निवड समितीचे सदस्य स्प्लिट कॅप्टन्सीच्या विरोधातच होते. ज्यावेळी विराट कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले त्यावेळी त्याला तसे करु नको, असे सांगितले. पण तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्याच्या या भूमिकेनंतर मर्यादित संघासाठी एकच कॅप्टन असावा म्हणून रोहितकडे वनडेचे नेतृत्व देण्यात आले, असे सौरव गांगुलींनी म्हटले होते.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli) टीम इंडियातील (Team India) मर्यादीत षटकातील कॅप्टन्सी (Captaincy) बदलावर मोठे वक्तव्य केले आहे. टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) पदावर कायम राहण्याचा कोणताही प्रस्ताव ठेवला नव्हता, असे तो म्हणालाय. विराट कोहलीचे हे वक्तव्य सौरव गांगुलींना खोटे पाडणारे आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच कोहलीने टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली होती. वर्कलोडमुळे हा निर्णय घेतला असून वनडे आणि कसोटीमध्ये नेतृत्व करेन, असेही त्याने यावेळी स्पष्ट केल होते. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी खराब झाली. या दौऱ्यावरुन परतल्यानंतर विराट विश्रांती घेतली. दरम्यानच्या काळात टी-20 वर्ल्ड कपची जबाबादारी रोहित शर्माच्या खांद्यावर आली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी कसोटी संघाची निवड करताना निवड समितीने कोहलीची चर्चा केली. याचवेळी त्याला वनडेचं कर्णधार पद तुझ्याकडून काढून घेत आहोत, असे त्याला सांगण्यात आले.
कोहलीने कसोटीमध्येही कॅप्टन्सीशिवाय खेळायला तयार असल्याचे सांगत बीसीसीआय घेईल तो निर्णय मान्य करण्यास तयार असल्याची भूमिका घेतली. विराट कोहलीने खुद्द यावर भाष्य केले आहे. कोणत्याही पदाशिवाय संघासाठी सर्वोच्च कामगिरी करेन, या तोऱ्यात आक्रमक विराटने संयमी तोऱ्यात बीसीसीआयला अप्रत्यक्षरित्या उत्तर दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.