भारताचा स्टार युवा क्रिकेटपटू शुभमन गिलची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 23 वर्षीय क्रिकेटर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या टी 20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 6 वे शतक पूर्ण केले आहे.
प्रकाशझोतात आलेल्या शुभमनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. त्याचे नाव सारा तेंडुलकर आणि सारा अली खान या दोघींशीही जोडले जाते. परंतु या दोन सारांपैकी शुभमन कोणत्या साराला डेट करत आहे. याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम आहे.
अशातच आणखी एक तरुणी शुभमनच्या मागे लागली आहे. तिने तर थेट टिंडर अँपलाच शुभमन आणि तीच नातं जुळवण्याची विनंती केली. यासंबधीच पोस्टर तिने हातात घेऊन त्याला दाखवलं आहे. तरुणींकडून शुभमनला मिळणाऱ्या या अटेंशनवरून आता भारतीय क्रिकेटपटू उमेश यादव याने ट्विट करत त्याला ट्रोल केलं आहे.
त्या मुलीच्या हातात पोस्टर होते. ज्यामध्ये टिंडर या डेटिंग अॅपसाठी 'Match Tinder with Shubman' असे लिहिले होते. या तरुणीच्या पोस्टर नंतर शुभमनची चर्चा आणखी वाढली. टिंडर अॅपने नागपुरात अनेक ठिकाणी या पोस्टरची जाहिरात केली आहे. अॅपद्वारे पोस्टरच्या एका बाजूला मुलीचे पोस्टर चित्र जोडलेले आहे. दुसऱ्या बाजूला 'शुबमन इकडे बघ' असे लिहिले आहे. हे सर्व पाहिल्यानंतर शुभमन गिलने इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मुलीची इच्छा पूर्ण होताना दिसते.हे पोस्टर सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले.
मालिका जिंकल्यापासून हे पोस्टर चर्चेचा विषय होते, आजवर गिलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण आता या तरुण गिलने इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो हावभावांमध्ये सर्वकाही समजावून सांगत आहे.
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना रंगणार आहे. याकरता भारतीय संघ नागपूरमध्ये दाखल झाला आहे. असे असतानाच सामन्यापूर्वी नागपूर शहरात लागलेले पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर भारत-न्यूझीलँड मॅच दरम्यान पोस्टर हातात घेऊन टिंडरला "शुभमनसे मॅच करा दो" अशी विनंती करणाऱ्या मुलीचा फोटो आहे. याला टिंडरने आपल्या जाहिरातीसाठी वापरून त्याच्यावर शुभमन इधर तो देख लो असे लिहिले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.