तुम्ही बिनधास्त खेळा; तालिबान्यांचा अफगाण क्रिकेटला पाठिंबा

अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ नोव्हेंबरमध्ये एकमेव कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
afghanistan cricket
afghanistan cricket
Updated on

afghanistan crisisतालिबान राजवटीमुळे अफगाणिस्तान क्रिकेटही अडचणीत सापडणार का? असा प्रश्न सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरतोय. अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीनंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील नियोजित मालिका स्थगित झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेल्या अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तालिबानकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ नोव्हेंबरमध्ये एकमेव कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. पण पाकिस्तान विरुद्धची त्यांची मालिका स्थगित झाल्यामुळे अफगाणिस्तान संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले होते. हा कसोटी सामना 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसंदर्भात रंगलेल्या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. तालिबानने अफगाणिस्तान क्रिकेटच्या भविष्यासंदर्भात मोठी आणि महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे.

afghanistan cricket
'IPL से इश्क है तो रिस्क है!' दोन नव्या संघासाठी BCCI चं टेंडर

स्थानिक प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, तालिबानने म्हटलंय की, अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण होणार नाही. तालिबान राजवटीत खेळाला प्रोत्साहन दिले जाईल. तालिबानी सांस्कृतिक आयोगाचे उप प्रमुख अहमदुल्ला वासिक म्हणाले की, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नियोजित मालिका वेळापत्रकानुसारच होईल. भविष्यात सर्व देशांसोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न राहिला.

afghanistan cricket
सिक्सर मारेन अन् बघणारही नाही.... फ्लेचरचा No Look SIX पाहाच

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील अफगाणिस्तानसोबतचा नियोजित कसोटी सामना खेळवण्याची तयारी सुरु केलीये. होबार्टच्या मैदानातील सामन्यासंदर्भात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या संपर्कात असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. दोन्ही बोर्डामध्ये सकारात्मक चर्चा सुरु असून नियोजित सामन्याच्या तयारीला सुरुवात देखील केलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.