Cricket World Cup 2023 : पाकिस्तानसाठी सलामी सोपी मात्र गाफील राहणे पडू शकते महागात !

Team Pakistan
Team PakistanEsakal
Updated on

Cricket World Cup 2023 : बाबर आझमच्या नेतृत्वाखाली भारतात आलेल्या पाक संघाचा एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत उद्या पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत आलेल्या नेदरलँडशी सामना होत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत सोपी असेल.

आशिया करंडक स्पर्धेत पहिल्या चार संघांत चौथ्या स्थानी घसरण झालेल्या पाकला विश्वकरंडक स्पर्धेसाठी ही लढत आत्मविश्वास वाढवणारी ठरू शकेल, मात्र वर्चस्व अपेक्षित असले तरी नेदरलँडसला गृहीत धरण्याची चूक त्यांना महागात पडू शकते.

पाकचे दोन्ही साखळी सामने हैदराबादमध्ये झाले आहेत. त्यामुळे त्यांना येथील परिस्थितीचा, खेळपट्टीचा चांगला अनुभव आला आहे. मात्र न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध या दोन्ही सामन्यांत त्यांच्या गोलंदाजांनी तीनशेपेक्षा अधिक धावा दिल्या होत्या.

वेगवान गोलंदाज नसीम शाहची अनुपस्थिती पाकला जाणवू शकते. त्यामुळे शाहीन आफ्रिदीवर त्यांची मदार असेल. हॅरिस रौफने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात ९७ धावा दिल्या होत्या. फिरकी गोलंदाजीत शादाब खान आशिया करंडक स्पर्धेपासून अडखळत आहे, तर त्याचा लेगस्पिनर साथीदार उस्मा मीरही फॉर्म मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

Team Pakistan
World Cup 2023 : भारतीय फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी व्यूहरचना; पॅट कमिन्स, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सज्ज

२०११ नंतर नेदरलँड पुन्हा विश्वकरंडक स्पर्धेत खेळत आहे. वेस्ट इंडीजला मागे टाकून या विश्वकरंडक स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली, पण भारतात आल्यावर त्यांच्या दोन्ही सराव सामन्यांत पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे त्यांना पुरेशी तयारी करता आलेली नाही. त्यांच्या संघातील वेस्ली बॅरेसी हा एकमेव खेळाडू २०११ च्या स्पर्धेत खेळलेला आहे. तो निवृत्ती मागे टाकून पुन्हा खेळत आहे. दक्षिण आफ्रिका संघातून या अगोदर खेळलेला ३८ वर्षीय रोएलॉफ व्हॅन डर मर्वे हा त्यांचा महत्त्वाचा खेळाडू असेल.

नेदरलँड संघातील आणखी एक हुकमी खेळाडू अष्टपैलू , बास डी लीड याचे वडील टीम हे सुद्धा अगोदरच्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळलेले होते. याच बास डी लीडने पात्रता स्पर्धेत स्कॉटलंडविरुद्ध ९२ चेंडूत १२३ धावांची वेगवान खेळी साकार केली होती.

Team Pakistan
World Cup 2023 Team India : टीम इंडियाची जर्सी झाली भगवी... विराट अन् रोहितचा फोटो होतोय व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.