ICC World Cup 2023 : सध्या सगळीकडे आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकपची धामधूम सुरू आहे. 19 नोव्हेंबर, म्हणजेच उद्या या विश्वचषकातील अंतिम सामना पार पडणार आहे. या वर्ल्डकपमध्ये आयसीसी, डिज्नी-हॉटस्टार या कंपन्यांची बक्कळ चांदी झाली आहे. तसंच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये देखील यामुळे वाढ होणार आहे.
अमर उजालाने दिलेल्या रिपोर्टनुसार, या विश्वचषकाचे प्रक्षेपण करणाऱ्या डिज्नी+हॉटस्टारला तब्बल 2,500 रुपयांचा फायदा होण्याची शक्यता आहे. यामध्ये टीव्हीच्या (स्टार नेटवर्क) कमाईचा देखील सहभाग आहे. गेल्या कित्येक सामन्यांमध्ये हॉटस्टारवर ह्यूवरशिपचा मोठा रेकॉर्ड झाला आहे. भारत-न्यूझीलंड सेमी-फायनल मॅच तर तब्बल 5 कोटींहून अधिक लोकांनी ऑनलाईन पाहिला होता.
यंदाच्या विश्वचषकात आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल (ICC) देखील मालामाल झाली आहे. आयसीसीला सहा ग्लोबल पार्टनर्स मिळाले आहेत. यामध्ये एमआरएफ टायर्स, बुकिंग डॉट कॉम, इंडसइंड बँक, मास्टरकार्ड, अरामको आणि एमिरेट्स अशा कंपन्यांचा समावेश आहे. या वर्ल्डकपमधून आयसीसीला तब्बल 1,249 कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याची शक्यता आहे. (Sports News)
यंदाचा वर्ल्डकप भारतात आयोजित करण्यात आला होता. जवळपास सर्वच सामन्यांमध्ये स्टेडियमवर हजारो प्रेक्षक उपस्थित होते. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला तर तब्बल एक लाख प्रेक्षक उपस्थित होते. आता अंतिम सामना देखील तिथेच होणार आहे, त्यालाही एक लाखांपेक्षा जास्त दर्शकांची उपस्थिती दिसण्याची शक्यता आहे.
2019 साली ब्रिटनमध्ये झालेल्या वर्ल्डकपमुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला सुमारे 3,600 कोटींचा फायदा झाला होता. मात्र यंदाच्या भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 13 ते 20 हजार कोटींचा फायदा होण्याची शक्यता आहे. अंतिम सामना झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांमध्ये आयसीसी याबाबत संपूर्ण रिपोर्ट प्रसिद्ध करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.